Homeडेली पल्स‘कठुआ’: हिंदूंना जम्मूतून...

‘कठुआ’: हिंदूंना जम्मूतून हाकलून देण्यासाठीचे षड्यंत्र!

वर्ष 2018 मध्ये जम्मूतील रसाना नावाच्या लहानशा गावातील खोट्या बलात्कार प्रकरणाला ‘कठुआ बलात्कार’ प्रकरण म्हणून जगभर प्रसिद्ध करण्यात आले आणि षड्यंत्रपूर्वक हिंदूंना त्यात गुंतवून बदनाम करण्यात आले. देशभरातील सेक्युलरवाद्यांनी, बॉलीवूडच्या अभिनेत्यांनी आणि हिंदुविरोधकांनी या प्रकरणाचा वापर जगभरात हिंदूंना बदनाम करण्यासाठी केला. हिंदूंनी पीडितेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्त्या केली, असे कथानक खोट्या पुराव्यांच्या आधारे तयार करून त्याचा जगभर प्रचार केला. यामागे हिंदूंना बदनाम करण्याचे आणि काश्मीरनंतर जम्मूच्या क्षेत्रातून बाहेर काढण्याचे एक नियोजनबद्ध षड्यंत्र होते, असा आरोप दिल्ली येथील ‘द गर्ल फ्रॉम कठुआ’ या पुस्तकाच्या लेखिका आणि ‘मानुषी’च्या संपादिका प्रा. मधु किश्वर यांनी केला.

त्या ‘श्रीरामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘कठुआ येथील सत्य’ या विषयावर बोलत होत्या. या प्रकरणात हिंदूंवर ‘गँगरेप’चा आरोप लावण्यात आला; मात्र शवविच्छेदन अहवालात बलात्कार झाल्याचा निष्कर्षच मान्य केलेला नाही. संबंधित मुलीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्त्या करण्यात आली, असे पोलीस तपासात नमूद असताना शवविच्छेदन अहवालात कुठेही कवटीला मार लागलेला दिसून आला नाही. अशा अनेक विसंगती त्या अहवालात आढळून आल्या आहेत. कोणत्याही अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख उघड करणे कायद्याने गुन्हा आहे; पण या प्रकरणामध्ये पीडितेचे छायाचित्र आणि नाव माध्यमांमधून जाणीवपूर्वक उघड करण्यात आले. या प्रकरणात तपासाच्या नावाखाली हिंदू युवकांचा छळ करण्यात आला. परिणामी कठुआतून अनेक हिंदू कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले, असे त्यांनी सांगितले.

अरुणाचलमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू!

सध्या अरुणाचल प्रदेशमधील प्रत्येक कुटुंबातील एकतरी सदस्य धर्मांतरित आहे. इतकी गंभीर स्थिती आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही एक उपाय काढला. जी हिंदु व्यक्ती अन्य धर्मांतील व्यक्तीशी विवाह करेल, तिला हिंदू कुटुंबातील संपत्ती मिळणार नाही आणि तिची मुलेही तिला स्वतःलाच सांभाळावी लागतील. यामुळे या समस्येला काही प्रमाणात चाप बसला आहे. अरुणाचल प्रदेशमधील आम्ही हिंदू संघटित असल्याने पुढील 5 वर्षांत अरुणाचल प्रदेशमधील ख्रिस्ती धर्मांतराची समस्या संपवू, असा ठाम विश्वास ‘अरुणाचल प्रदेश बांबू संसाधन आणि विकास एजन्सी’चे उपाध्यक्ष कुरु ताई यांनी यावेळी व्यक्त केला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content