Homeकल्चर +हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या...

हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या मुंबई-१ केंद्रातून ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ प्रथम

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-१ केंद्रातून ग्रामीण समाज प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या “ज्याचा त्याचा प्रश्न” या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई या संस्थेच्या “मॅकबेथ” या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी एका केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-१ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-

सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई मनपा, मुंबई या संस्थेच्या “फ्लाईंग राणी” या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक वनमाला वेंदे (नाटक- ज्याचा त्याचा प्रश्न), द्वितीय पारितोषिक प्रसिध्दी राजेश (नाटक- मॅकबेथ), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- ज्याचा त्याचा प्रश्न), द्वितीय पारितोषिक – प्रशांत सावंत (नाटक- मॅकबेथ), नेपथ्य प्रथम पारितोषिक संतोष मोरे (नाटक- गुलमोहर), द्वितीय पारितोषिक रोहिणी पालवे (नाटक- बोल राधा बोल), रंगभूषा प्रथम पारितोषिक शेखर केमनाईक (नाटक- विजयस्तंभ), द्वितीय पारितोषिक दिवाकर मोहिते (नाटक- शेवंता जिती हाय) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सौरभ येसवारे (नाटक- खटला) व वनमाला वेंदे (नाटक- ज्याचा त्याचा प्रश्न), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे नम्रता म्हेत्रे (नाटक- बोल राधा बोल), नम्रता काळसेकर (नाटक- धनंजय माने इथे रहातात का?), प्रियंका जाधव ठोकळे (नाटक- फ्लाईंग राणी), नेहा शर्मा (नाटक- आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे), ऐश्वर्या शिंदे (नाटक- गुलमोहोर), प्रमोद सुर्वे (नाटक- मॅकबेथ), सचिन शिंदे (नाटक- ज्याचा त्याचा प्रश्न), अशोक पालवे (नाटक- बोल राधा बोल), अनिल तांबे (नाटक- शेवंता जिती हाय), पुष्कर सराड (नाटक- अण्णांच्या शेवटच्या इच्छा).

दि. २० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर, २०२३ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. समीर मोने, विनोद दुर्गापुरे आणि सुजाता गोडसे यांनी काम पाहिले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content