Homeडेली पल्समुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम...

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम स्पर्धेत जागुष्टे, फैझान विजयी

मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित  व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट दादर येथे झालेल्या ३२व्या जुनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत अंतिम सामन्यात ए. के. एफ.च्या कौस्तुभ जागुष्टेने  ए. के. एफ.च्याच महम्मद नावेद शेखचा १७-११, १८-० असा पराभव करत मुलांच्या १८ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकाविले.

२१ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत ए. के. एफ.च्या फैझान अब्दुल रहमानने डी. के. सी. सी.च्या सार्थक नागावकरचा १८-७, १५-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकाविले.

विजेत्यांना मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतीन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, सहसचिव संजय बर्वे व सेंट्रल रेल्वे इंस्टिट्यूटचे सदस्य पेडणेकर यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content