Homeएनसर्कल'होर्मूझ'च्या अमेरिकी नाकाबंदीला...

‘होर्मूझ’च्या अमेरिकी नाकाबंदीला चीनचे थेट आव्हान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक कोंडी करण्याकरीता होर्मूझ सामुद्रधुनीभोवती नाकाबंदी सुरू केली असतानाच चीनने अमेरिकेच्या या कृतीला थेट आव्हान दिले आहे. अमेरिकेने आमच्या जहाजांना या नाकाबंदीत अडवू नये, असे म्हणत त्यांनी त्यांचे एक तेलवाहू होर्मूझ सामुद्रधुनीतून पाठवलेही. अमेरिकेनेही चीनच्या जहाजाला अडवण्याचे पाऊल उचलले नाही. त्यामुळे या दोन देशांतला संघर्ष सध्यातरी टळला आहे. रशियानेही अमेरिकेच्या या नाकाबंदीला विरोध केला आहे. एक नाकाबंदी तोडण्यासाठी दुसरी नाकाबंदी करणे योग्य नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक अस्थिरता होईल आणि जागतिक मंदी उग्र स्वरूप धारण करेल, असे त्यांनी म्हटले आहे. नाटो, या संघटनेतल्या देशांनीही अमेरिकेला या नाकाबंदीत मदत करण्यास नकार दिला आहे. या नाकाबंदीत आमचा सहभाग नसेल, असे ब्रिटन तसेच फ्रान्सने स्पष्ट केले आहे.

अमेरिका-व्हॅटिकनमधला संघर्ष विकोपाला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्हॅटिकनचे धर्मगुरू पोप लिओ चौदावे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. इराणवरील अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर पोप यांनी टीका केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली असून, त्यांना “कमकुवत” आणि “परराष्ट्र धोरणात अपयशी” म्हटले आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत पोप लिओ चौदावे यांना गुन्हेगारी रोखण्यात “कमकुवत” आणि परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत “भयानक” म्हटले आहे. इराण आणि व्हेनेझुएलामधील अमेरिकन भूमिकेला पोप यांनी विरोध केल्याने ट्रम्प यांनी ही नाराजी व्यक्त केली.

स्वयंघोषित येशू ख्रिस्त

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर स्वतःचे एक एआय-निर्मित चित्र शेअर केले, ज्यामध्ये ते येशू ख्रिस्ताच्या रूपात एका आजारी व्यक्तीला बरे करताना दिसत आहेत. या चित्रात अमेरिकन ध्वज आणि ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ सारखी प्रतीके वापरण्यात आली होती. मात्र, तीव्र धार्मिक आणि राजकीय टीकेनंतर हे चित्र डिलीट करण्यात आले. पोप यांनी मात्र त्याला सडेतोड उत्तर दिलेआहे. “मला ट्रम्प प्रशासनाची अजिबात भीती वाटत नाही,” अशा शब्दांत पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. शांततेचे आवाहन करणे आणि युद्धाचा निषेध करणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वादाची पार्श्वभूमी

इराणमधील संघर्षावरून पोप यांनी “सर्वशक्तिमान असल्याचा भ्रम” (डिल्यूजन ऑफ ओमनीपोटन्स) युद्धाला खतपाणी घालत असल्याची टीका केली होती. या टीकेचा रोख ट्रम्प प्रशासनाकडे असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अमेरिका आणि व्हॅटिकन यांच्यातील हा थेट संघर्ष जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे ख्रिश्चन धर्मीय आणि राजकीय विश्लेषकांमध्ये दोन गट पडले असून, आगामी काळात हे द्वंद्व अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content