Homeब्लॅक अँड व्हाईटडिजिकोअरच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या...

डिजिकोअरच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या! २८२पट ओव्हरसबस्क्राइब्ड!!

गुंतवणूदारांनी दाखवलेल्या अफाट उत्साहामुळे डिजिकोअरच्या बहुप्रतिक्षित प्रारंभिक सार्वजनिक प्रस्तावाला (आयपीओ) आज अखेरचा दिवस संपेपर्यंत २८२ पट ओव्हरसबस्क्रिप्शन प्राप्त झाले. सोमवारी, २५ सप्टेंबर २०२३ रोजी खुला झालेला आयपीओ आज २७ सप्टेंबर २०२३ रोजी बंद झाला. प्रस्तावाच्या कालावधीत गुंतवणूकदारांनी या आयपीओची तुफान मागणी केली. लक्षणीय बाब म्हणजे, डिजिकोअरच्या आयपीओला अँकर गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यांनी सप्टेंबर २२, २०२३ रोजी ८.२२ कोटी रुपयांची ग्वाही देत यशाची पायाभरणी केली.

डिजिकोअरच्या आयपीओने सुरुवातीपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्याच दिवशी सबस्क्रिप्शनचे आकडे २२.५० पट होते, तर दुसऱ्या दिवशी ते ७६.८९ पटींनी अधिक होते. ह्याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी आयपीओला प्रचंड प्रतिसाद दिला. आयपीओने एकूण ११,२३,२०० उपलब्ध समभागांच्या मोबदल्यात ३१,६२,४८,८०० इक्विटी समभागांसाठी बोली आकर्षित केल्या. यातून डिजिकोअरचे समभाग घेण्याची गुंतवणूकदारांमधील प्रबळ इच्छा दिसून आली.

आयपीओचे एकूण आकारमान ३०.४८ कोटी रुपयांपर्यंत आहे. ह्यात २१.५५ कोटींच्या १२,६०,८०० इक्विटी समभागांच्या ताज्या इश्यूचा आणि ५,२१,६०० समभागांच्या विक्री प्रस्तावाचा (ओएफएस) समावेश आहे. डिजिकोअरच्या आयपीओची दरश्रेणी १६८ ते १७१ रुपये प्रति समभाग अशी निश्चित करण्यात आली होती. आयपीओचे लॉट आकारमान ८०० समभाग असल्यामुळे ते व्यवस्थापनास सोपे होते.

कंपनीने आयपीओपूर्व निधीउभारणी फेरीचीही यशस्वी सांगता केली होती. ह्यात उद्योगक्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या गुंतवणूका कंपनीने आकर्षित केल्या होत्या. यामध्ये निखिल वोरा, विजय खेतान, मृणाल सिंग, प्रमोट कासट आदींचा सहभाग होता. डिजिकोअरने अॅनिमेशन व व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) जगताला दिलेल्या नवोन्मेष्कारी योगदानांचे प्रचंड मूल्य या गुंतवणूकदारांनी ओळखले.

२००० साली स्थापन झालेली डिजिकोअर स्टुडिओज लिमिटेड ही कंपनी व्हिज्युअल इफेक्ट्स सेवांची विस्तृत श्रेणी पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये चित्रपट, वेबसीरिज, टीव्ही मालिका, माहितीपट व अन्य जाहिरातींना दिल्या जाणाऱ्या व्हिज्युअल इफेक्ट्स सेवांचा समावेश होतो.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content