Homeकल्चर +तेलंगणातले रुद्रेश्वर मंदिर...

तेलंगणातले रुद्रेश्वर मंदिर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत!

भारतातल्या रुद्रेश्वर मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळजवळच्या मालुगू जिल्ह्यात असलेल्या पालमपेठमधील हे मंदिर रामाप्पा मंदिर या नावानेही ओळखले जाते. या मंदिराचा समावेश झाल्याने भारताच्या ३९ वास्तूंनी आतापर्यंत युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४४व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामप्पा मंदिर तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारे एक विशेष अद्भुत आहे. मंदिराच्या वास्तुविशारदाच्या नावावरून ते रामाप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी २०१९मध्ये भारत सरकारतर्फे या एकमेव स्थळाचा नामनिर्देश केला गेला होता.

“जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नुकताच भारतातील तेलंगणाच्या काकतीया रुद्रेश्वर म्हणजेच रामाप्पा मंदिराचा समावेश. ब्राव्हो!!”, असे ट्विट करत युनेस्कोने ही घोषणा केली.

तेलंगणा राज्यातील वारंगळजवळील मालुगू जिल्ह्यातल्या पालमपेठ येथील रामप्पा मंदिर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रुद्रेश्वर मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून संयुक्त राष्ट्र शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक संस्था म्हणजेच युनेस्कोने मान्यता दिली. यासंदर्भात मार्गदर्शन तसेच सहकार्य दिल्याबद्दल केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. रेड्डी यांनी भारतीय सर्वेक्षण विभाग तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचेही आभार मानले आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content