Homeब्लॅक अँड व्हाईटआंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंच्या...

आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंच्या भत्त्यात 66% वाढ

भारतीय क्रीडापटू आणि संघ अधिकाऱ्यांना भोजन आणि निवासासाठी (बोर्डिंग आणि लॉजिंग) दिल्या जाणाऱ्या रकमेची कमाल मर्यादा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 66%ने वाढवली आहे.मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांना (एनएसएफ) साहाय्य योजनेअंतर्गत ही तरतूद केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणार्‍या खेळाडूंसाठी आणि अधिकार्‍यांसाठी आहे. नवीन सुधारित नियमांनुसार, परदेशात मान्यताप्राप्त स्पर्धांसाठी प्रवास करणारे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना आता प्रतिदिन 250 अमेरिकन डॉलर मिळतील. याआधी ही तरतूद प्रतिदिन 150 अमेरिकन डॉलर मिळायचे.

राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या विनंत्या विचारात घेऊन ही सुधारणा करण्यात आली आहे. स्पर्धांच्या स्थानिक आयोजन समितीने (LOC) निश्चित केलेले बोर्डिंग आणि लॉजिंगचे दर सध्याच्या 150 अमेरिकन डॉलर प्रतिदिन या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहेत, हे या महासंघांनी विनंती अर्जात नमूद केले होते.  बोर्डिंग आणि लॉजिंगचे हे निकष नोव्हेंबर 2015 मध्ये निश्चित करण्यात आले होते आणि त्यात सुधारणा होऊन आठ वर्षे झाली आहेत.

या नव्या निर्णयामुळे विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये  देशाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या खेळाडूंची वाजवी दरात उत्तम राहण्याची व्यवस्था होऊ शकेल. अलीकडील कल असा दिसतो की आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या स्थानिक आयोजन समित्या सहभागी संघांना पूर्वीप्रमाणे फक्त बोर्डिंग आणि लॉजिंगची व्यवस्था करण्याऐवजी संपूर्ण आदरातिथ्य पॅकेज देत आहेत. या पॅकेजमध्ये भोजन, निवास, स्थानिक वाहतूक खर्च आणि काही प्रसंगी प्रवेश शुल्क देखील समाविष्ट आहे. पॅकेजची एकूण किंमत प्रति व्यक्ती प्रतिदिन 150 अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे. या विचारांमुळे 2015 मध्ये निश्चित केलेल्या बोर्डिंग आणि लॉजिंग नियमांचे पुनरावलोकन करणे आवश्यक ठरले होते.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content