Homeमाय व्हॉईसजैवइंधन आघाडी आणि...

जैवइंधन आघाडी आणि आफ्रिकी महासंघाचा समावेश, हे भारताचे प्रमुख यश!

जागतिक जैवइंधन आघाडी आणि आफ्रिकी महासंघाचा जी 20 मध्ये समावेश, हे भारताने आपल्या जी-20 अध्यक्षीय कारकिर्दीत मिळवलेले प्रमुख यश असल्याचे प्रतिपादनही डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. या जागतिक जैवइंधन आघाडीचे नेतृत्व भारत, ब्राझील आणि अमेरिका करणार असून प्रमुख जैवइंधन उत्पादक आणि ग्राहक म्हणून ही आघाडी, भारताला 2070 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश बनवण्याचे आपले एमडीजी अर्थात सहस्रकातील विकासाचे उद्दिष्ट गाठण्यात मोठ्या प्रमाणावर मदत करेल, असेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

नुकत्याच पार पडलेल्या जी-20 भारत शिखर परिषद आणि जी-20 नवी दिल्ली जाहीरनाम्याच्या फलनिष्पत्तीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), तसेच अंतराळ आणि अणुऊर्जा मंत्री, डॉ. जितेंद्र सिंह यांनी प्रस्तावित भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्गिकेचा (IMEC) विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक मार्गिका म्हणजे फाळणी नंतर भारताने या टापूत व्यापक आणि सखोल, संपर्क आणि दळणवळण व्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी ठेवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता आहे. पाकिस्तानने संपर्क आणि दळणवळणासाठी आपल्या भूमीचा वापर करायला नकार देत निर्माण केलेल्या अडथळ्यांना, ही मार्गिका दूर करेल आणि या टापूत हातपाय पसरण्याचे चीनचे प्रयत्नसुद्धा उघड करेल, असेही ते म्हणाले.

या संपूर्ण मार्गिकेत भारताला आखाती देशांशी जोडणारा सुरूवातीचा मार्ग आणि आखाती देशांना युरोपशी जोडणारा नंतरचा मार्ग यांचा समावेश आहे. यात सागरी-रेल्वेचे परस्पर पूरक वाहतूक जाळे आणि रस्ते वाहतूक मार्गांना सामावून घेतले जाईल.

या आर्थिक पट्ट्या बाबतच्या सामंजस्य करारावर, भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, युरोपीय महासंघ, इटली, फ्रान्स आणि जर्मनी यांनी स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा पुनरुच्चार करत डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले की उत्तम दळणवळण व्यवस्था केवळ व्यापारातच वाढ करत नाही तर परस्पर विश्वास सुद्धा दृढ करते. पाकिस्तानने संपर्क आणि दळणवळणासाठी आपल्या भूमीचा वापर करायला नकार देत निर्माण केलेल्या अडथळ्यांना, हा पट्टा दूर करेल आणि या टापूत हातपाय पसरण्याचे चीनचे प्रयत्न सुद्धा उघड करेल, असेही त्यांनी सांगितले.

जी -20 दिल्ली जाहीरनाम्याने वादग्रस्त मुद्दे बगल न देता अतिशय न्याय्यपणे हाताळले, असेही ते म्हणाले.

घोषणापत्रात हे मान्य केले आहे की जी-20 ने केलेला निर्धार हा आर्थिक सहकार्यासाठी एक मंच म्हणून कार्य करण्यासाठी आहे, मात्र त्याच वेळी, युद्धानंतर आर्थिक संकटे उद्भवत असल्याने, आम्ही मानवी वेदना आणि युद्धांची तसेच जगभरातील संघर्षाच्या प्रतिकूल परिणामांची गंभीरपणे दखल घेतो असेही डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

डॉक्टर जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की भारताची अध्यक्षीय कारकीर्द सर्वसमावेशक, यशस्वी घडामोडींनी भरलेली आणि दर्जात्मकदृष्ट्यासुद्धा व्यापक होती.

जी-20 अध्यक्षीय कारकिर्दी अंतर्गत, भारतात 60 शहरांमध्ये एकूण 220 बैठका झाल्या अशी माहितीही त्यांनी दिली.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content