Homeटॉप स्टोरीमुंबई-गोवा वंदे भारत...

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ पुढे ढकलला!

ओडिशाच्या बालासोरमध्ये काल रात्री झालेल्या अत्यंत भीषण रेल्वे अपघातामुळे चा भीषणतेमुळे आज होत असलेल्या गोव्यातला पहिला वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पणाचा समारंभ पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम होणार होता.

काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसच्या गाडीचे १८ डबे रुळावरून घसरले. त्यानंतर या घसरलेल्या डब्यांवर अन्य एक रेल्वे तसेच मालगाडी धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात २३३ प्रवासी मरण पावल्याचे समजते. ९००हून अधिक प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या अतिशय भीषण अशा दुर्घटनेमुळे व्यथित होऊन पंतप्रधानांनी आजच्या वंदे भारत गाडीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकल्याचे जाहीर केल्याचे कळते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी ११.०५ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मडगाव रेल्वेस्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच सायंकाळी ६.५० वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदेभारत एक्स्प्रेसचे स्वागत करणार होते.

मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वेगाडी देशातील १९वी आणि राज्यातील चौथी वंदे भारत रेल्वे असेल. ही रेल्वेगाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल. यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वेगाडी दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल, असे या रेल्वेचे वैशिष्ट्य आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणारी वंदेभारत एक्स्प्रेस ५ जून २०२३पासून नियमित धावणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल, तर मडगाव येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. त्यानंतर मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल. मडगाव, थिवीम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) असे या गाडीचे थांबे असतील.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content