Homeकल्चर +बिग बॉसमध्ये मीराचं...

बिग बॉसमध्ये मीराचं ऐकलं नाही ना तर..

बिग बॉस मराठीच्या घरात काल बिग बॉसने “जिंकू किंवा लढू” हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य असेल असे जाहीर केले. आणि या साप्ताहिक कार्याच्या अंतर्गत उपकार्य सदस्यांना देण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

“माझे मडके भरी” हे पहिले उपकार्य अक्षय आणि विशालमध्ये झालेल्या भांडणामुळे रद्द करण्यात आले आणि बिग बॉसने सदस्यांना ताकीदही दिली. अशाप्रकारच्या कृत्याचा ते निषेध करतात. आज नवा दिवस… बघूया आज बिग बॉस सदस्यांना कोणता नवा टास्क देणार ते..

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉसने घोषित केले आहे की, “घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही”. आणि त्यामुळे घरामध्ये जरा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

हा आदेश येताच सदस्य एकावर एक मजेदार वाक्य करण्यास सुरुवात करतात. गायत्री आणि तृप्ती देसाई यांनी वाक्य टाकायला सुरुवात केली. तृप्ती म्हणाल्या की, हारे हारे हारे… तर गायत्री म्हणाली ‘जे वापरणार बेड.. त्यावर तृप्तीताई म्हणाल्या की, आमची डायरेक्ट पडणार रेड” आता सदस्यांना हे फर्निचर कसे मिळणार? कुठला नवा टास्क बिग बॉस देणार? बघूया आजच्या भागात..

याउलट दुसरीकडे स्नेहा, सुरेखा कुडची, दादुस, तृप्तीताईंचा एका वेगळा स्वतंत्र ग्रुप तयार झालेला दिसत आहे. हा गट म्हणजे घरातला सी ग्रुप. तृप्तीताई म्हणाल्या सी फॉर क्लिअर. एच्या आणि बीच्या बाजूने नसलेला ग्रुप. आज याच ग्रुपमध्ये चर्चा रंगणार आहे, ज्यामध्ये स्नेहा यांना सांगताना दिसणार आहे.. मीरा मला सांगत होती त्या पेंटमध्ये पाणी टाकुया. आता तो ऑइल पेंट. त्यात पाणी कसं मिक्स होणार. आणि तिचं नाही ऐकलं तर तिचा तिळपापड होतो. आणि त्यांच्यासोबतही तेच झालं. ती स्वत:चे नियम बनवते हे खरं आहे.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा सुरू झाला आणि काही दिवसातच घरातील काही सदस्य एका ग्रुपमध्ये तर काही सदस्य दुसर्‍या ग्रुपमध्ये दिसून आले. काही सदस्य नक्की कुठल्या ग्रुपमध्ये हे काही कळत नव्हतं. पण जसजसे दिवस पुढे जात आहेत आता ते स्पष्ट होते आहे. काल बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क रंगला. त्यासाठी बिग बॉसने दोन ग्रुप घोषित केले. आणि त्याच टास्कसंदर्भात आज विकास आपलं मत स्पष्टपाने मांडताना दिसणार आहे. आज घरामध्ये काय काय होणार? कोणतं नवं आव्हान बिग बॉस सदस्यांसमोर उभं करणार? बघूया आजच्या भागामध्ये.

मीनल, आविष्कार, विशाल आणि सोनालीला विकास सांगताना दिसणार आहे, “मला तुम्हाला उत्कर्षबद्दलचं माझं दिवसभरातलं ऑब्झरवेशन सांगायचं आहे. पहिला टास्क जेव्हा आला ना तेव्हा त्याचं असं होतं, मी त्यांची मडकी फोडणार. मला असं वाटलं त्याचा डिस्ट्रक्शनवर जास्त भर आहे. काहीतरी क्रिएट करण्यावर नाही. त्याने हे प्लॅन केलंच नाही की आपली मडकी कशी वाचवता येतील. मी जाऊन त्यांची मडकी फोडणार इतकंच त्याचं म्हणणं होतं. दुसरी गोष्ट.. तो खूप बडबड करतो. मी असं करेन, तसं करेन.. मला महेश सरदेखील म्हणाले ना, मी हुशार आहे. उगीच नाही बोलले. बघ मी काय करतो, असं तो तृप्तीताईंना सांगत होता. खरं सांगायचं ना तर उत्कर्ष “बोलबच्चन” आहे. त्याची मेंटल, फिझिकल कॅपेब्लिटी काही नाहीये”.

आज बिग बॉस सदस्यांना काही कोडी देणार आहे आणि त्यांना ते शोधायचे आहे, नक्की काय आहे टास्क.. कळेलच आज. बिग बॉस मराठीत, आज रात्री.. कलर्स मराठीवर.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content