Homeपब्लिक फिगरसंधी दिली तर...

संधी दिली तर नक्कीच त्याचं सोनं करीन…

या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वत्र फिरत आहे. गावोगावी दादांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा लेखाजोखा नागरिक मांडत आहेत. त्याचवेळी काही प्रलंबित विषयही समोर येतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहीन, असं आश्वासन देतानाच तुम्ही संधी दिली तर नक्कीच चांगलं काम करुन दाखवेन. त्यासाठी सर्वांनी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावं, असे आवाहन महायुतीच्या बारामतीतल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल केले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार सध्या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या प्रथमच बारामती तालुक्याचा दौरा करत आहेत. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथून सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला काल सुरुवात करण्यात आली. सुनेत्रा पवार यांनी काल दिवसभर बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content