Homeबॅक पेजजागतिक डीपीआय शिखर...

जागतिक डीपीआय शिखर परिषदेचे आयोजन यशस्वी

जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्य गटाच्या तिसऱ्या बैठकीचा उप-कार्यक्रम म्हणून जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय) शिखर परिषदेचे गेले दोन दिवस यशस्वी आयोजन  करण्यात आले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  तसेच कौशल्य विकास आणि उद्योजगता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते या शिखर परिषदेचे उद्घाटन झाले. सुमारे 50 देशांतील 150 प्रतिनिधी आणि 250 हून अधिक प्रतिनिधींनी प्रत्यक्ष हजेरी लावली आणि 2000 हून अधिक व्यक्तींनी दूरदृश्य प्रणालीद्वारे हजेरी लावली. शिखर परिषदेदरम्यान, भारताने आर्मेनिया, सिएरा लिओन, सुरीनाम आणि अँटिग्वा आणि बारबुडा या चार देशांसोबत इंडिया स्टॅक म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलात आणलेले यशस्वी डिजिटल उपाय सामायिक करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

क्षेत्रीय डीपीआय वर दहा चर्चासत्रे झाली. डीपीआय वर सुमारे 60 जागतिक तज्ञांनी सखोल दृष्टीकोन असलेली, विचार करायला लावणारी आणि परिणामाभिमुख चर्चा केली. पहिल्या दिवशी म्हणजे 12 जून 2023, ‘डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा आढावा’, ‘लोकांच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल ओळख’, ‘डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय समावेशन’, ‘न्यायिक प्रणाली आणि नियमांसाठी डीपीआय’ अशी चार सत्रे झाली.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content