Homeन्यूज ॲट अ ग्लांसयुद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या रविवारी इराण आणि अमेरिकेत कायमच्या युद्धविरामाच्या दृष्टीने चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाच्या काळात होर्मूझची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली राहील. मात्र, युद्धनौकांसाठी ती बंदच ठेवण्यात येईल, असेही इराणने स्पष्ट केले आहे.

होर्मूझ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा केल्याचे सांगितले. होर्मूझ वाहतूकीला खुली झाल्याची बातमी पसरताच कच्चा तेलाच्या किमती १० टक्क्यांनी उतरल्या. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेने होर्मूझच्या सामुद्रधुनीला कडे करून इराणच्या दिशेने जाणाऱ्या तसेच इराणकडून येणाऱ्या व्यापारी जहाजांची कोंडी करून इराणची आर्थिक नाकेबंदी चालू केली होती. त्याचवेळी समझोत्यासाठी कासावीस आणि उतावीळ झालेले डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांना इराणमध्ये जाऊन समझोत्याचा प्रस्ताव देण्यास सांगितले. त्यानुसार फिल्डमार्शल मुनीर यांनी तेहरानमध्ये जाऊन इराण सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर ट्रम्प यांच्याच विनंतीनंतर मुनीर यांनी अमेरिकेचे वॉशिंग्टन डीसी गाठले. ट्रम्प यांच्याबरोबर झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर आज संध्याकाळी इराणने होर्मूझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केल्याचे जाहीर केले. मात्र, इराणबरोबर पूर्ण समझोता होईपर्यंत अमेरिकेकडून करण्यात आलेली होर्मूझची नाकेबंदी कायम राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. येत्या रविवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची पुढची फेरी होण्याची शक्यता आहे.

होर्मूझ

अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देताना इराणने होर्मूझची सामुद्रधुनी वाहतूकीसाठी बंद करून संपूर्ण जगाला वेठीला धरले होते. समुद्री सुरूंग पेरून तेथून जाणाऱ्या जहाजाला उडवण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या अमेरिकेने होर्मूझची सामुद्रधुनी खुली करण्याकरीता सर्व देशांकडून, खास करून नाटोमधल्या युरोपियन देशांकडून सहकार्य मागितले. परंतु या राष्ट्रांनी त्यास नकार दिला. त्यात ब्रिटन, फ्रांस, जर्मनी, इटली आदी ४० देशांचा समावेश आहे. रशिया आणि चीननेही अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याला उघडपणे विरोध करून त्यामुळे निर्माण झालेल्या होर्मूझच्या कोंडीबद्दल अमेरिकेवर टीका केली. ज्या अरब राष्ट्रांमध्ये, ज्यामध्ये युएई, सौदी अरेबिया, बाहरीन, जॉर्डन, कुवैत आदी १२ राष्ट्रांचा समावेश आहे त्यात अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्त्युत्तर देताना इराणने या अरब राष्ट्रांवर हल्ले करत त्यांची कोंडी केली. त्यामुळे या आखाती राष्ट्रांकडूनही ट्रम्प यांच्यावर युद्धबंदीसाठी दबाव वाढला. या युद्धामुळे अमेरिकेची जगभरात छीतू झाली. ट्रम्प यांची देशांतर्गत लोकप्रियता झपाट्याने घसरली. अमेरिकेत याविरोधात लोक रस्त्यावर उतरले. हे प्रमाण रोजच्या रोज वाढत आहे. याऊलट इराणमध्ये तेथील जनता सध्याच्या सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे ट्रम्प यांनीही सध्या नरमाईची भूमिका घेतल्याने हा संघर्ष निवळण्याच्या मार्गावर आला आहे, असे जाणकार सांगतात.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content