Homeकल्चर +हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट‘मनी...

हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट‘मनी प्लेन’ आता मराठी ओटीटीवर!

आजवरची सर्वात मोठी चोरी करणारा नायक ज्या चित्रपटात खळबळ उडवून टाकतो, तो हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मनी प्लेन’ आता रसिक प्रेक्षकांना मराठीत पहायला मिळणार आहे. हा चित्रपट १५ डिसेंबरला ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात गुंतवून ठेवणार आहे.

चित्रपटाची कथा ‘मनी प्लेन’ या नावाने ओळखली जाणारी एअरबोर्न कॅसिनोवरील मोठ्या चोरीभोवती फिरते. जिथे जगातील सर्वात मोठमोठे गुन्हेगार उपस्थित आहेत. हे मोठमोठे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गुन्हेगार जुगार खेळण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा चित्रपटाच्या नायकाला स्वतःवरचे कर्ज मिटवून कुटुंबाला वाचवण्याची संधी मिळते.आयुष्यातील सर्वात मोठी चोरी करण्याचे धाडस नायक करणार की कुटुंबाला कर्जात बुडवणार हे चित्रपटात कळणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने पूर्ण अॅक्शन आणि सस्पेन्स भरलेला चित्रपट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला असेच अॅक्शन आणि रोमांचक चित्रपट पाहायला आवडत असतील तर ‘मनी प्लेन‘ चित्रपट तुमच्यासाठी अगदी योग्य चित्रपट ठरणार आहे असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content