Homeब्लॅक अँड व्हाईट५ कोटींचे बनावट...

५ कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवल्याप्रकरणी ६ कंपन्यां प्रमुख अटकेत!

सीजीएसटी, नवी मुंबई यांनी बोगस/बनावट संस्थांकडून मिळवलेल्या 5.01 कोटी रुपयांच्या पावत्यांच्या आधारावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याच्या/वापरल्याच्या/जारी केल्याच्या आरोपावरून सहा कंपन्यांचे मालक आणि त्यांचे  व्यावसायिक व्यवहार हाताळणाऱ्या प्रमुख व्यक्तींना नुकतीच अटक केली. कोणत्याही वस्तू अथवा सेवांचा पुरवठा न करता बनवण्यात आलेल्या या बनावट पावत्यांची किंमत अंदाजे रु. 30 कोटी इतकी आहे.

या सहा कंपन्याची नावे पुढीलप्रमाणे. मेसर्स ब्लूस्की ट्रेडिंग कंपनी (GSTIN – 27AAHHN6764P1ZA), मेसर्स स्कॉर्पियन एंटरप्रायझेस, (GSTIN – 27AKUPD0205A2ZR), मेसर्स सीए ट्रेडर्स (GSTIN – 27AOKPD3230P1ZS), मेसर्स अमृत ट्रेडर्स (Imp6LX164P1ZA), मेसर्स सोना ट्रेडिंग कंपनी (GSTIN – AOKPD2878R1Z4) आणि मेसर्स श्री सत्यम ट्रेडिंग कंपनी (GSTIN – 27AELPD5876Q1ZM).

सीजीएसटीचे फसवणूक विरोधी पथक आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या कंपन्यांची चौकशी केली.

या कंपन्यांनी रु. 5.01 रकमेच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला असून, तो बोगस/बनावट संस्थांकडून बोगस पावत्यांच्या आधारे प्राप्त करण्यात आला आणि जारी करण्यात आला.

CGST कायदा, 2017 च्या कलम 132(1) (b) आणि (c) च्या तरतुदींनुसार, जर करदात्याने वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता पावत्या आणि/किंवा बिले जारी केली किंवा चुकीच्या पद्धतीने इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर किंवा वापर केला, किंवा अशा पावत्या किंवा बिल वापरून इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला, तर कलम 132(1) (i) नुसार करदात्याला दंडासह पाच वर्षांपर्यंतचा कारावास देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे कलम 132(5) नुसार, हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. उपरोक्त आरोपींना केंद्रीय वस्तू व सेवा अधिनियम, 2017 च्या कलम 69 (1) अंतर्गत सदर कायद्याच्या कलम 132 (1)(b) आणि (c) अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल अटक करण्यात आली.

आज (25.08.2023) बेलापूर येथील वाशी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केल्यावर, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सीजीएसटी नवी मुंबई विभागाच्या फसवणूक विरोधी अभियानाचा भाग होता. फसवणूक आणि करचुकवेगिरी करून, कायद्याचे पालन करणाऱ्या करदात्यांविरोधात चुकीच्या मार्गाने स्पर्धा निर्माण करून, सरकारी तिजोरीची लूट केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे, प्रभात कुमार – आयुक्त, CGST आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, नवी मुंबई आयुक्तालय, यांनी ही माहिती दिली.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content