Homeब्लॅक अँड व्हाईटहरमित सिंगची 'महाराष्ट्र...

हरमित सिंगची ‘महाराष्ट्र श्री’ला गवसणी

शिवसेना पुरस्कृत महाराष्ट्र श्रीवर मुंबईच्याच खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. अवघ्या महाराष्ट्रातून आलेल्या ३००पेक्षा अधिक खेळाडूंच्या संघर्षात मुंबई उपनगरच्याच हरमित सिंगने आपली ताकद दाखवत जेतेपदाला गवसणी घातली. मुंबई श्रीचा किताब जिंकणारा उमेश गुप्ता उपविजेता ठरला. मात्र मिस मुंबई ठरलेल्या रेखा शिंदेने मिस महाराष्ट्रचाही किताब पटकावला. महिलांच्या फिटनेस फिजीक प्रकारात सुनंदा सुतळेने बाजी मारली. पुरुषांच्या फिजीक स्पोर्ट्स प्रकारात आदित्य ठाणे आणि कौस्तुभ हाडकर हे मुंबईकरच अव्वल ठरले.

मुंबई श्रीपाठोपाठ महाराष्ट्र श्रीच्या पाठीशीही आपली पोलादी ताकद उभारणार्‍या शिवेसना सचिव सिद्धेश कदम यांच्या पुढाकारामुळे मुंबईच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात पार पडलेल्या स्पर्धेने एक वेगळीच उंची गाठली. एखाद्या आंतरराष्ट्रीय महोत्सवालाही लाजवेल असे आयोजन आणि खेळाडूंवर झालेला रोख पुरस्कारांचा वर्षाव हे तर स्पर्धेचे आकर्षण होतेच, पण पोलादी महाराष्ट्र दाखवण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या ३००पेक्षा अधिक खेळाडूंच्या उपस्थितीमुळे स्पर्धेच्या प्रत्येक गटात काँटे की टक्कर झाली.

जजेसना फुटला घाम

महाराष्ट्रातून आलेल्या ३००पेक्षा अधिक स्पर्धकांमुळे प्रत्येक गटात आव्हान उभे करणार्‍या २५पेक्षा अधिक खेळाडूंमुळे अव्वल सहा खेळाडूंची निवड करताना जजेसना अक्षरशः घाम फुटला. सारेच खेळाडू एकापेक्षा एक असल्यामुळे गटविजेता कोण ठरणार हेसुद्धा सांगणे कठीण होऊन बसले होते. ५५, ६० आणि ६५ किलो वजनी गटात स्पर्धा प्रचंड तीव्र होती. पण या तिन्ही गटात पुण्याच्या खेळाडूंनी मुंबईच्याच खेळाडूंना मागे टाकत अव्वल स्थान संपादले. मात्र त्यानंतर मुंबई आणि उपनगरनेच आपले वर्चस्व सिद्ध केले. उपनगरचे उमेश गुप्ता, अक्षय खोत, विजय ठसाळे आणि हरमित सिंग यांनी ६ पैकी ४ गटात बाजी मारली. फक्त अक्षय देवरे (रायगड) आणि चेतन नाईक (प. ठाणे) हे दोघेच मुंबईबाहेरील होते.

पोलादी महाराष्ट्राला विम्याचेही कवच

सिद्धेश कदम यांनी महाराष्ट्र श्री स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील शेकडो स्पर्धकांना विम्याचे पोलादी कवच जाहीर केले आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या शरीराला आखीवरेखीव करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणार्‍या सर्व खेळाडूंचा २ लाख रुपयांचा विमा उतरविण्यासाठी कदम यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शेकडो खेळाडूंचा विमाही उतरविला. उर्वरित महाराष्ट्रातील खेळाडूंनीही या विम्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

विजेता आणि उपविजेता दोघेही लखपती

यंदाच्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत विजेत्यांवर रोख पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला. महाराष्ट्र श्रीचा किताब पटकावणारा हरमित सिंग दोन लाख रुपयांचा मानकरी ठरला तर उपविजेता उमेश गुप्तासुद्धा लखपती झाला. सिनेस्टार विद्युत जामवालनेही विजेत्या हरमित सिंगची शरीरयष्टी पाहून स्वतःकडून दोन लाखांचे रोख बक्षीस दिले. त्याचबरोबर प्रत्येक गटातील अव्वल सहा खेळाडूंवर ६९ हजार रुपयांची उधळण केली. अद्भूत आणि अतिभव्य झालेल्या या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा राज्याचे माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, सिनेस्टार विद्युत जामवाल, आयबीबीएफएफचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे, अजय खानविलकर, राजेश सावंत, किट्टी फणसेका, सुनील शेगडे, विशाल परब, राजेंद्र सातपुरकर आणि स्पार्टन न्यूट्रिशन्सचे ऋषभ चोक्सी यांच्या उपस्थितीत पार पडला.

रेखा शिंदेचा डबल धमाका

पुरूषांमप्रमाणे महिलांच्या स्पर्धाही चुरशीच्या झाल्या. मिस मुंबई जिंकणार्‍या रेखा शिंदेने मिस महाराष्ट्रातही आपलेच पीळदार सौंदर्य दाखवून जेतेपदाचे चुंबन घेतले. महिलांच्या दोन्ही गटात मुंबईच्याच सौंदर्यवतींचा बोलबाला दिसला. फिटेनस फिजीक प्रकारात पश्चिम ठाण्याची सुनंदा सुतळे अव्वल ठरली. विशेष म्हणजे दोन्ही गटात दहापेक्षा अधिक स्पर्धकांची उपस्थिती होती.

महाराष्ट्र श्री २०२४ स्पर्धेचा निकाल

५५ किलो: १. रोशन घारे (पुणे), २. अक्षय गव्हाणे (मुंबई उपनगर), ३. संजय भोपी (रायगड), ४. ओमकार भानसे (मुंबई उपनगर), ५. ओमकार साईम (मुंबई), ६. गितेश मोरे (रायगड)

६० किलो: १. बाळू काटे (पुणे), २. रोशन पाष्टे (मुंबई), ३. जुगल शिवले (रायगड), ४. रोहन भोसले (मुंबई उपनगर), ५. प्रशांत घोलम (मुंबई उपनगर), ६. सचिन सावंत (पुणे)

६५ किलो: १. नरेंद्र व्हालेकर (पुणे), २. संकेत भरम (मुंबई उपनगर), ३. मंगेश बैत (पुणे), ४. अनिल जैसवाल (मुंबई), ५. कुलदीप रजपूत (मुंबई ), ६. उदेश ठाकूर (रायगड)

७० किलो: १. उमेश गुप्ता (मुंबई उपनगर), २. अमेय नेवगे (मुंबई), ३. विलास घडवले (मुंबई उपनगर), ४. तेजस भालेकर (मुंबई), ५. अक्षय दांडेकर (कोल्हापूर), ६. करण पाटील (नाशिक )

७५ किलो: १. उदय देवरे (रायगड), २. संतोष भरणकर (मुंबई उपनगर),  ३. आकाश दडमल (पुणे), ४. विशाल धावडे (मुंबई उपनगर), ५. गणेश दुसारीया (छत्रपती संभाजीनगर), ६. गणेश उपाध्याय (मुंबई)

८० किलो: १.अक्षय खोत (मुंबई उपनगर), २. विशाल गिजे (मुंबई उपनगर),  ३. विशाल सिन्हा (कोल्हापूर), ४. शैलेंद्र यादव (पुणे), ५. ओमकार पाबळकर (कोल्हापूर),  ६. अक्षय शिर्वेâ (पुणे)

८५ किलो: १. विजय ठसाळे (मुंबई उपनगर), २. संदेश नलावडे (पुणे), ३. अमित साटम (मुंबई उपनगर), ४. प्रणव खातू (मुंबई), ५. उदय ननावरे (पुणे), ६. अमित कदम (रायगड)

९० किलो: १. चेतन नाईक (पश्चिम ठाणे), २. सोहम चाहनकर (पुणे), ३. सुनील गुरव (मुंबई), ४. मल्लेश धनगर (पुणे), ५. प्रथमेश तोडणकर (मुंबई)

९० किलोवरील: १. हरमित सिंग (मुंबई उपनगर), २. उबेद पटेल (मुंबई उपनगर), ३. जीवन सकपाळ (पालघर), ४. प्रवीण मोरे (नाशिक)

महाराष्ट्र श्री विजेता: हरमित सिंग,  उपविजेता: उमेश गुप्ता,  तृतीय क्रमांक: उदय देवरे

फिजिक्स स्पोर्ट्स (पुरुष) १६५ सेमी: १. आदित्य ठाणे (मुंबई), २. अनिकेत पाटील (रायगड), ३. समाधान मिसाळ (नाशिक), ४. सचिन बोइंगवाड (पश्चिम ठाणे), ५. रोहन भोसले (मुंबई उपनगर), ६. प्रतीक साळवी (मुंबई उपनगर)

१६५ सेमीवरील: १. कौस्तुभ हाडकर (मुंबई उपनगर), २. अक्षय दांडेकर (कोल्हापूर), मंगेश बैत (पुणे), ३. रोहन गोगावले (पुणे), ४. मंगेश भोसले (मुंबई उपनगर), ५. बाबी पाटील (रायगड)

फिटनेस फिजीक (महिला): १. सुनंदा सुतळे (पश्चिम ठाणे), २. पुनम शिंदे (रायगड), ३. गौरी वरणकर (रायगड), ४. ग्रंथाली हांडे (मुंबई),५. निकिता जाधव (मुंबई ), ६. प्रतिमा कांबळे (रायगड)

महिला शरीरसौष्ठव: १. रेखा शिंदे (मुंबई),  २. सुनंदा सुतळे (पश्चिम ठाणे), ३. पूनम शिंदे (रायगड), ४. गौरी वरणकर (रायगड ), ५. सुप्रिया इल्हे (पुणे), ६. शर्वरी गोडसे (मुंबई)

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content