Homeकल्चर +"ना ते आपुले"चं...

“ना ते आपुले”चं शनिवारी अभिवाचन आणि प्रकाशन

ग्रंथाली प्रकाशित “ना ते आपुले” डॉ. विजयकुमार देशमुखलिखित नाटकाचं अभिवाचन आणि प्रकाशन विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या विशेष उपस्थितीत येत्या शनिवारी, दि. ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वा. मुंबईत वांद्रे पश्चिम इथं होणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री सारिका निलाटकर-नवाथे, लेखिका डॉ. स्मिता दातार, सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पानबुडे आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी दिली आहे. ख्यातनाम अभिनेते संजय कुलकर्णी यांच्यासह, ऋचा देशमुख, उमेश घळसासी, ज्ञानेश्वरी देशपांडे, आशिष कुलकर्णी, राखी राणे हे रंगकर्मी या नाटकाचं अभिवाचन करणार आहेत.

शनिवार, दि. ७ जानेवारी २०२३, सायंकाळी ६ वा. वेळेवर कार्यक्रम सुरू होईल. “ग्रंथाली प्रतिभांगण”, आयडेंटीटी बिल्डिंग, केन रोड, मन्नत बंगल्याजवळ, बॅन्डस्टॅन्ड, वांद्रे (पश्चिम) मुंबई इथं हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्था तसंच नाट्य रसिकांनी अगत्यानं उपस्थित राहवं, असं आवाहन लेखक आणि दिग्दर्शक डॉ. विजयकुमार देशमुख यांनी केलं आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिक माहितीसाठी ९३२०३०४०५९ किंवा ९८२१७७६४६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन ग्रंथाली प्रकाशननं केलं आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content