Homeकल्चर +राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी...

राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनी केले ‘मोदीज मिशन’चे प्रकाशन

बर्जिस देसाई लिखित “मोदीज मिशन” या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजभवन येथे आज झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेचे आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे. मोदी यांनी आपल्या आयुष्यात अनेक अशक्य वाटणारे निर्णय घेतले, जसे कलम ३७० रद्द करणे, रामजन्मभूमीचा प्रश्न शांततेत सोडवणे. जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवणे, हे त्यांच्या दृढ इच्छाशक्तीचे द्योतक आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. देश, समाज आणि मानवतेच्या सेवेसाठी सतत कार्य करणे, हीच त्यांची साधना आहे, असे राज्यपाल देवव्रत यांनी याप्रसंगी सांगितले.

‘मोदीज मिशन’मधून राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची जी पायाभरणी केली आहे, ती अवर्णनीय आहे. या पुस्तकात मोदी यांच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही, तर एका व्यक्तीच्या मूल्यांची, जाणीवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याच्या वृत्तीची निर्मिती कशी होते, हे दाखवले आहे. मोदी यांनी सेवा आणि संन्यास या दोन्ही मार्गांचा अनुभव घेतल्यानंतर, संघकार्याद्वारे राष्ट्रभावना जागृत करण्याचा संकल्प केला. त्यांच्या नेतृत्त्वाखाली देशात 370 कलम रद्द करणे, राममंदिर उभारणी, नागरिकत्व कायदा किंवा तिहेरी तलाक बंदी यांसारखे ऐतिहासिक निर्णय झाले. या सर्व निर्णयांच्या मागे राष्ट्रचेतनेची जाणीव असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मोदी म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त एक व्यक्तिमत्व नाहीत, तर देशाचे वर्तमान आणि भविष्य आहेत. त्यांच्या कामगिरीचा प्रवास संघर्षमय असून, तो प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. हे पुस्तक फक्त नरेंद्र मोदींच्या चरित्राचे वर्णन नाही, तर त्यांच्या कार्याची सत्यकथा आहे. मोदींच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती एका पुस्तकात सामावणे शक्य नाही, कारण त्यांनी अशक्याला शक्य करून दाखवले आहे. मागील अकरा वर्षांत भारतात झालेले सकारात्मक बदल जगभरात कौतुकास्पद ठरले आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमात “मोदीज मिशन” पुस्तकाचे लेखक बर्जिस देसाई यांनीही विचार मांडले.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content