Homeब्लॅक अँड व्हाईटप्रगती मैदानावरच्या पुस्तक...

प्रगती मैदानावरच्या पुस्तक मेळाव्यात सरकारी प्रकाशन विभाग सहभागी!

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे 29 जुलै ते 2 ऑगस्ट 2023 दरम्यान आयोजित दिल्ली पुस्तक मेळा या बहुप्रतिक्षित पुस्तक मेळाव्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा प्रकाशन विभाग सहभागी होणार आहे.  हा 27 वा मेळावा इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन या संस्थेने भारतीय प्रकाशक महासंघाच्या सहकार्याने  आयोजित केला आहे. प्रगती मैदानाच्या स्टॉल क्रमांक 12, हॉल क्रमांक 11 येथे प्रकाशन विभाग पुस्तके आणि जर्नल्सचा विस्तृत संग्रह प्रदर्शित करेल आणि निवडक पुस्तकांवर भरघोस सवलत देखील देणार आहे.

‘राष्ट्र उभारणीत पुस्तकांची भूमिका’ ही या पुस्तक मेळ्याची संकल्पना असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशन विभाग भारतीय स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांचा समृद्ध संग्रह या मेळाव्यात प्रदर्शित करणार आहे. ही पुस्तके या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पुस्तक प्रेमींची मनं नक्कीच आकर्षित करतील. प्रदर्शनामध्ये गांधीवादी साहित्य, इतिहास आणि स्वातंत्र्य लढा, व्यक्तिमत्त्वे आणि चरित्रे, जमीन आणि लोक, कला आणि संस्कृती, चित्रपट आणि बालसाहित्य यासारख्या विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनावर विशेष पुस्तके तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवडक भाषणांचा संग्रह देखील प्रकाशन विभागाद्वारे मेळाव्यात उपलब्ध करून दिला जाणार असून  प्रकाशन विभागाने ते खास प्रकाशित केले आहे.

पुस्तकांव्यतिरिक्त , प्रकाशन विभागाची योजना, कुरुक्षेत्र, आजकल आणि बालभारती यांसारखी लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर प्रसारित नियतकालिकेही स्टॉलवर उपलब्ध आहेत. विभागाद्वारे प्रकाशित नियतकालिके आणि एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचार वार्षिक वर्गणी भरून वाचकप्रेमी खरेदी करू शकतात.

विद्यार्थ्यांना, विशेषत: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांना प्रकाशन विभागाच्या स्टॉलवर योग्य पुस्तके मिळतील जी त्यांना परीक्षेची तयारी करण्यास मदत करतील. विभागाचा बालसाहित्याचा समृद्ध संग्रहदेखील मुले आणि पालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. एखाद्याला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल अधिक जाणून घेण्यात, देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबाबत, राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केलेल्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल किंवा चांगले पुस्तक शोधणाऱ्या प्रत्येकासाठी प्रकाशन विभागाकडे काही ना काही आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content