Homeएनसर्कलसार्वभौम सुवर्ण रोख्यांत...

सार्वभौम सुवर्ण रोख्यांत गुंतवणुकीची संधी 15 सप्टेंबरपर्यत!

भारत सरकारने दिनांक 14 जून 2023 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्रमांक 4(6)-B(W&M)/2023 अनुसार, सार्वभौम सुवर्ण रोखे 2023-24 (मालिका II) कालपासून खुली झाली असून ती 15 सप्टेंबर 2023पर्यंत, 20 सप्टेंबर 2023 या सेटलमेंट तारखेसह सदस्यत्वासाठी खुली होईल.

सदस्यत्व कालावधी दरम्यान रोख्यांची जारी (इश्यू) किंमत प्रति ग्रॅम रु. 5,923 (रुपये पाच हजार नऊशे तेवीस फक्त) राहील, भारतीय रिझर्व बँकेने 08 सप्टेंबर 2023 रोजी प्रकाशित केलेल्या निवेदनातदेखील हे नमूद करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल माध्यमातून पेमेंट करणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू किमतीवर प्रति ग्रॅम रु. 50 (रुपये पन्नास फक्त) सूट दिली जाईल. भारतीय रिझर्व बँकेशी सल्ला मसलत केल्यावर भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांची इश्यू किंमत, प्रति ग्रॅम सोन्यासाठी रु. 5,873 (रुपये पाच हजार आठशे त्र्याहत्तर फक्त) इतकी राहील.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content