Homeपब्लिक फिगरदसऱ्याच्या पूर्वसंध्येला आमदारांना...

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आमदारांना गिफ्ट! विकासनिधी ४ कोटी!!

राज्यातल्या आमदारांचा स्थानिक विकासनिधी तीन कोटी रूपयांवरून चार कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आमदारांचा स्थानिक विकासनिधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात यात आणखी वाढ करण्याचा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी अधिवेशनाच्या काळात सभागृहात दिला होता. हा शब्द पाळताना त्यांनी आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत आणखी एक कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकासकामांसाठी प्रत्येक वर्षी चार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे.

विकासनिधी

गेल्या दीड वर्षापासून राज्यासह देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदारांचा विकासनिधी गोठवला आहे. त्यामुळे स्थानिक विकासकामांसाठी खासदारांकडे कोणताही निधी उपलब्ध नाही. मात्र, राज्यातल्या आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत उपमुख्यमंत्री पवार यांनी एक कोटीची वाढ करुन तो तीन कोटी करण्याची घोषणा केली होती. भविष्यात या स्थानिक विकासनिधीत आणखी वाढ करण्याचा शब्द दिला होता.

आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत वाढ केल्यामुळे सामान्य जनतेच्या विकासांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विधानसभेतील २८८ आणि विधान परिषदेतील ६२ अशा एकूण ३५० आमदारांना ३५० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व आमदारांना मिळून आता प्रत्येकवर्षी एकूण १४०० कोटी रुपयांचा स्थानिक विकासनिधी मिळणार आहे. राज्याच्या इतिहासातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. त्याचबरोबर आमदारांच्या स्थानिक विकासनिधीतून, प्रत्येकी एक कोटीचा निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी खर्च करण्यास आमदारांना परवानगीही देण्यात आली आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content