Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज गायत्री करते आदिशची नक्कल!

बिग बॉस मराठीमध्ये काल सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला आणि त्याने तो पूर्णपणे निभावलाही. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे. दादुस, मीनल आणि जय, हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत.

काल जय आणि आदिशमध्ये खूप मोठा राडा झाला. आदिश घरामध्ये आल्यापासून घरातील काही सदस्यांचे त्याच्याविषयीचे मत बरं नाही असे दिसून येत आहे. काल त्यावर चर्चा झालीच आणि आजही होणार आहे. जय, स्नेहा, गायत्री आणि उत्कर्ष त्याच्याविषयी बोलताना दिसणार आहेत.

जय गायत्रीला सांगणार आहे, “खरं बोलू का गायत्री, आवडतो मला तुझा अटीट्यूड”. गायत्री म्हणाली, “माझ्या फ्रेंडला कोणी काही बोललं तर मी तोंडावर बोलणार. उत्कर्ष म्हणाला, “तो कॉमेडी” आहे. जयचंपण म्हणणं पडलं- कसा चालतो तो बघितलं का? जसा काही, हा कोणी सव्वाशेर, खरंच कॉमेडी आहे… गायत्री तो कसं चालतो याची नक्कल करून दाखवणार आहे. स्नेहा म्हणतेय, “मी त्याच्याकडे बघून बोलत नव्हते, तर तो मला बोलला तू माझ्याकडे बघतपण नाहीये.” उत्कर्ष म्हणाला, “त्याचा हा सगळा दिखावा आहे”. इथे सगळ्यांना वाटतं, दोन दिन की चांदी है! बघूया पुढे या चर्चेमध्ये काय काय बोललं गेलं ते…

बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे नॉमिनेशन कार्य. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे, सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे. जीपमध्ये बसलेले सदस्य आहेत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे. आता स्नेहाला नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी जय कोणते डावपेच आखणार? जयची साथ स्नेहाला मिळेल?

याचसोबत स्नेहा आणि आदिशमध्ये आज पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार आहे. आदिशची एंट्री झाल्यापासून तो प्रत्येक सदस्याशी हुज्जत घालताना दिसत आहे असे स्नेहाचे आणि इतर सदस्यांचे मत आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरात खळबळ उडाली आहे. सगळेच त्याच्याविषयी बोलू लागले आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या ग्रुपमध्ये नकारात्मक भावना आहे, जी वेळोवेळी दिसून आली आहे.

आदिश आणि जयनंतर आता स्नेहा आणि आदिशमध्येही वाद होणार आहे. एका टास्कदरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करायला जाणार आहे. पण, त्या चर्चेचे रूपांतर भांडणामध्ये होणार आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे असं दिसतं. काही ना काही मुद्द्यांवरून खटके उडायला सुरुवात झाली आहे. आदिशचं म्हणण आहे, “तुझं वैयक्तिकरित्या इरिटेशन असेल तर… पण प्रतिक्रिया अशी माझा इन्फ्लुएन्स, मी जे बोलतो आहे तेदेखील काऊंट होणार आहे”. यावर स्नेहाचे म्हणणे आहे “तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होत नाही. तुम्हाला असं वाटत असेल मी तुमच्याकडे यावं प्रतिक्रिया मागायला.. तर तसं होणार नाहीये. मी काय विचारू”.

यानंतर आदिशनेही विचारले- काय? त्यानंतर हा वाद वेगळाच दिशेला गेला. बघूया नक्की काय झालं ते आजच्या भागामध्ये. आज रात्री बिग बॉस मराठीत कलर्स मराठीवर.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content