Homeकल्चर +सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर...

सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर लग्नानंतर प्रथमच एकत्र!

लाखो तरुणींच्या हृदयांची धडकन वाढविणारा चॉकलेट बॉय अर्थात गोड गुलाबजाम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड अँड ब्युटीफुल मिताली मयेकर, या मराठी सिने इंडस्ट्रीतील हॉट जोडीनं अलीकडेच लग्न केलं आणि कित्येकांचे हार्ट ब्रेक झाले.

पण आता त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘स्टोरीटेल मराठी’ या ऑडिओबुकने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सिरीजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर प्रथमच एकत्र आले आहे. ‘हौस हजबंड’ (Haus Husband) असं नाव असलेली ही ओरिजनल धम्माल ऑडिओ सिरीज तयार झाली आहे.

रोहित आणि रेवा.. आताच लग्न झालेलं, एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेलं एक कपल.. एकदम गुटर्रर्रर्रगूं! पण त्यांच्या नवरा-बायकोच्या रोलबद्दलच्या concepts जरा उलट्यापालट्या आहेत.. आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंत.. सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत..

अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का? की त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब या किश्श्याचं नेमकं काय होतं? त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट म्हणजेच ‘हौस हजबंड’!

‘फिरंग’ सीजन १, २ तसेच ‘तो ती आणि तिचा’ सीजन १, २ या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या  ओरिजनल रंगतदार रोमॅंटिक ऑडिओबुक सिरीजच्या यशस्वी निर्मितीसोबतच या नव्या माध्यमाशी एकरूप झालेल्या चतुरस्र युवा लेखिका गौरी पटवर्धन यांच्याच लेखणीतून ‘हाऊस हजबंड’ उतरले आहे. आधीच्या दोन्ही सिरीजप्रमाणेच या सीरिजलाही साहित्यप्रेमी प्रचंड प्रतिसाद देतील असा विश्वास ‘स्टोरीटेल मराठी’ला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे उत्तम अभिनय कौशल्यामुळे सिद्धार्थ-मितालीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच. आता ते आपल्या आवाजाच्या जादूनेही रसिकांना घायाळ करणार आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content