Homeकल्चर +प्रजासत्ताकदिन पथसंचलनात प्रथमच...

प्रजासत्ताकदिन पथसंचलनात प्रथमच सहभागी होणार ईशान्येकडील मुलींचा बँड!

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन पथसंचलन 2024मध्ये प्रथमच ईशान्येकडील 45 मुलींचा समावेश असलेला बँड सहभागी होणार आहे. या मुली 13-15 वयोगटातील असून, ईशान्येकडील राज्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतील आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत असलेली एनसीसीची व्याप्ती यातून अधोरेखित करतील.

दिल्ली कॅनटोनमेंट येथे काल आयोजित पत्रकार परिषदेत एनसीसीचे डीजी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी सांगितले की, महिनाभर चालणाऱ्या या पथसंचलनात देशभरातून एकूण 2,274 कॅडेट्स सहभागी होत असून, यामध्ये सर्वाधिक, म्हणजे 907 मुलींचा समावेश आहे. कॅडेट्समध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 122 तसेच ईशान्येकडील 177 जणांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, युवा परस्पर भेट कार्यक्रमा (YEP) अंतर्गत 25 मित्र देशांमधील कॅडेट्स आणि अधिकारी पथसंचलनात सहभागी होतील.

पथसंचलन

देशाच्या समृद्ध परंपरांचे प्रदर्शन करणे आणि कॅडेट्सची मूल्यप्रणाली मजबूत करणे, हे प्रजासत्ताक दिन पथसंचलनाचे उद्दिष्ट असल्याचे एनसीसीचे डीजी लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी अधोरेखित केले. हे पथसंचलन सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला चालना देईल आणि विविधतेमधील एकतेला बळ देईल. या पथसंचलनाला उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण राज्यमंत्री, संरक्षण दलाचे कर्मचारी आणि तिन्ही सेना प्रमुखांसह अनेक मान्यवर भेट देतील.

लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 2023मध्ये एनसीसीने अमलात आणलेल्या प्रमुख उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, 39 एक भारत श्रेष्ठ भारत शिबिरे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये दोन व्हायब्रंट व्हिलेज एरिया कॅम्प, तीन डीआरडीओ कॅम्प आणि एक एरोस्पेस कॅम्प यांचा समावेश होता. मेगासायक्लोथॉन, नारी वंदन रन, क्रीडा स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी, पर्वतारोहण मोहिमा आणि G20 कार्यक्रमांमधील उपस्थिती ही यासारखी इतर कामगिरी होती.

लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी विशेष नमूद केले की, तरुणांच्या बदलत्या आकांक्षांना सामावून घेण्यासाठी, कॅडेट्सच्या प्रशिक्षणामागच्या तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. “कॅडेट्सच्या भविष्यातील गरजांसाठी त्यांना सुसज्ज करण्यासाठी व्यक्तिमत्व विकास, नेतृत्त्वगुण आणि सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यांच्यामधून उत्तम नागरिक घडवणे, आणि ‘देश सर्वप्रथम’, ही भावना जागवणे, ही यामागची संकल्पना आहे,” ते म्हणाले.

Continue reading

‘अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा’ सन्मानसोहळा संपन्न

अस्मिता मराठीची गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा हा अत्यंत उच्च दर्जाचा असून सातत्याने हे पुरस्कार गिरगांव कट्टाचे सर्वेसर्वा प्रदीप मालणकर यांनी द्यावेत आणि समाजातल्या बुद्धिवंत, प्रतिभावंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत राहावे, अशा शब्दांत ज्येष्ठ...

जळगावच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर गरुडझेप!

महाराष्ट्रातल्या जळगावची लेक असलेली योगिता शर्मा हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन करून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुरतच्या एसव्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) येथे नुकत्याच झालेल्या स्टेम 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेत रसायनीच्या पिल्लई एचओसी...

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...
Skip to content