Homeपब्लिक फिगरसंभाजी भिडेंवर त्वरित...

संभाजी भिडेंवर त्वरित गुन्हा दाखल करा!

मनोहर ऊर्फ ​​संभाजी भिडे यांनी अमरावती येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या निंदनीय वक्तव्याच्या निषेधार्थ आज उत्तर-मध्य मुंबई महिला जिल्हा व चांदिवली महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्त्वाखाली चांदिवली मतदारसंघात विरोध प्रदर्शन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधीं व इतर महापुरुषांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी नसीम खान यांनी यावेळी केली.

यावेळी मुंबई महिला अध्यक्ष अनिशा बागुल, मुंबई सेवादल अध्यक्ष सतीश मनचंदा, मुंबई उपाध्यक्ष शरीफ खान, महासचिव प्रभाकर जावकर, उत्तर-मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष जगदीश आमिन, महिला जिल्हाध्यक्ष प्रियतमा सावंत, उत्तर भारतीय सेल जिल्हाध्यक्ष भरत सिंह, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष अरशद आजमी, माजी नगरसेवक अशरफ आजमी, दिलशाद आजमी, शरद पवार, सविता पवार, मसुद अंसारी यांच्यासह प्रदेश प्रतिनिधी गौस शेख, गणेश चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष माया खोत, वजीर मुल्ला यांच्यासह चांदिवली, कुर्ला आणि कलिना विधानसभेतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content