Homeमुंबई स्पेशलमुंबईत गोरेगावात द्रूतगती...

मुंबईत गोरेगावात द्रूतगती महामार्गावर होणार सुविधा संकुल

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गोरेगाव (पूर्व) परिसरात पश्चिम द्रूतगती महामार्गावरील विरवाणी इंडस्ट्रियल इस्टेटजवळ विविध अद्ययावत सुविधा संकुल उभारण्यात येणार आहे. यामध्ये स्त्री, पुरुष तसेच तृतीय पंथियांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा, महिलांसाठीच्या शौचालयात सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, बाळांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष, बाळांचे डायपर बदलण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाइल चार्गिंग स्टेशन आणि पेय पदार्थांसह ‘एटीएम’चीदेखील सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे शौचालयाच्या छतावर ‘सोलर पॅनल’ बसविण्यात येणार असून त्यापासून ऊर्जानिर्मितीदेखील करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपायुक्त विश्वास शंकरवार आणि उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात गोरेगाव (पूर्व) येथे पश्चिम द्रूतगती महामार्गावर १ हजार ४५३ फुटांच्या प्रशस्त जागेमध्ये सर्व सोयींनी युक्त सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘पी दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांनी दिली.

येथे सिसिटीव्ही कॅमेऱ्यासह सभोवतालच्या जागेवरती रंगीत फुलांची झाडे लावण्यात येणार आहेत. या प्रस्तावित शौचालय संकुलात पुरूषांसाठी ५ शौचकूप, महिलांसाठी ५ शौचकूप आणि दिव्यांगांसाठी १ शौचकूप असणार आहे. सौर ऊर्जानिर्मिती होण्याच्या दृष्टीने या शौचालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. या सोलर पॅनलमधून २० किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे. अशाप्रकारे निर्माण होणारी वीज विद्युत पुरवठा कंपनीला देण्यात येणार असून विद्युत पुरवठा कंपनीच्या मासिक बिलातून सदर रक्कम वजा केली जाणार आहे. त्यामुळे साहजिकच शौचालयाच्या मासिक खर्चात बचत होण्यासह पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे.

मुख्य रस्ते व द्रूतगती महामार्गावर शौचालयाची सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली तर नागरिकांची गैरसोय होणार नाही. या उद्देशाने या सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येणार आहे. पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत या शौचालयाची दैनंदिन स्वच्छता व देखरेखदेखील करण्यात येणार आहे. कार्यादेश निघाल्यानंतर १२ महिन्यांत या शौचालयाचे बांधकाम पूर्ण होईल, असेही सहाय्यक आयुक्त आक्रे यांनी सांगितले.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content