Homeबॅक पेजमालवाहतूक वाहनांच्या स्वयंचलित...

मालवाहतूक वाहनांच्या स्वयंचलित चाचणीसाठी पुढच्या ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!

रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 12 सप्टेंबर 2023 रोजी एक अधिसूचना (GSR 663(E) जारी केली आहे. ज्यानुसार केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 (CMVR 1989) नुसार नोंदणी झालेल्या मालवाहतूक वाहनांची स्वयंचलित चाचणी केंद्रांद्वारे अनिवार्य चाचणी करण्यासाठीच्या तारखेला या अधिसूचनेनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या अनिवार्य चाचणीसाठी 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख अधिसूचित करण्यात आली आहे.

संबंधित वाहनांची तंदुरुस्ती चाचणी ही केवळ स्वयंचलित चाचणी केंद्रांवरच (ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून) करून घ्यावी जी स्वयंचलित चाचणी स्थानके नोंदणी प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात नियम 175 अंतर्गत परिचालित आहेत, असे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी [GSR notification 272(E)] द्वारे 5 एप्रिल 2022 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या तारखा पुढील प्रमाणे होत्या.

1) अवजड मालवाहतूक वाहने/ अवजड प्रवासी वाहने यांच्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पुढे

2) मध्यम मालवाहतूक वाहने/ मध्यम प्रवासी वाहने आणि हलकी मोटार वाहने (ट्रान्स्पोर्ट) यांच्यासाठी 1 जून 2024 पासून पुढे.

राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content