Homeबॅक पेजआंतरराष्ट्रीय संगीत दिनी...

आंतरराष्ट्रीय संगीत दिनी होणार बहारदार कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय संगीत दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे सोमवार, दि. २ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता “वरदराज ॲंड फ्रेंड्स” या समूहाचा संगीत कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की, यात भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा सुरेल मिलाफ असून वरदराज भोसले यांची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे. कार्यक्रमात वरदराज (सतार), ऋषिकेश (तबला), प्रतीक (कीबोर्ड), हर्ष (ड्रम), चैतन्य (गिटार) आणि प्रथमेश (बासरी) यांचा सहभाग आहे. संगीताला कुठलेही बंधन नसते, शब्दांचेही. मनात उमटणारे भाव संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून निखळ आनंदाचा अनुभव श्रोत्यांना द्यावा हीच हा कार्यक्रम सादर करण्यामागची कलाकारांची भावना आहे. त्यामुळे अधिकाधिक रसिकांनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क- ०२२-२४३०४१५०. 

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content