Homeचिट चॅटदहावीचा परीक्षा अर्ज...

दहावीचा परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्यातल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यास येत असलेल्या अडचणींचा विचार करून संबंधित परीक्षा मंडळाने अर्ज भरण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता २५ जानेवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरू शकतील.

परीक्षा मंडळाने आज याबाबतचे परिपत्रक जारी केले. यापूर्वी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ११ जानेवारीपर्यंत होती. परिक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी चिंतेत होते. अनेक विद्यार्थी एकावेळेस अर्ज भरत असल्याने सकाळी १० वाजल्यापासून संबंधित वेबसाईट हँग झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची पंचाईत झाली. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक आदींनी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंडळाने ही मुदतवाढ जाहीर केली. अर्ज भरण्याची प्रक्रियाही मजबूत करण्याचा प्रयत्न मंळाकडून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

वसुबारस आणि भाऊबीज नाहीत दीपावलीचे भाग!

दीपावली हा प्रकाशाचा उत्सव! अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला...

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...
Skip to content