‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन काल सुरू झाला. आतापर्यंत घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सदस्यांची चांगलीच चिडचिड होताना पाहयला मिळत आहे. एकंदरीतच पहिल्या दिवसापासूनच सदस्यांचं खरं रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच ‘तू तू मै मै..’ झालेलं पाहायला मिळणार आहे.

घर म्हटलं की एकत्र नांदतानांदता भांड्याला भांडं लागतंच. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही सदस्यांमध्ये ‘तू तू मै मै..’ झालेलं पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात वर्षाताई मेकअप करताना दिसून येत आहेत. दरम्यान निक्की येऊन वर्षाताईंना म्हणते की, “तुम्ही कृपया नंतर मेकअप करा.” त्यावर वर्षाताई निक्कीला म्हणतात की, “मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे.. तू व्यवस्थित तयार झालीस.” पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते की, “लिपस्टिक नंतर लावा.. आधी बाहेर येऊन बसा.. लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही…”

घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर ‘बिग बॉस’ आदेश देणार आहेत. त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्व सदस्य बेडरुमध्ये मेकअप करणाऱ्या वर्षाताईंना बाहेर बोलवताना दिसत आहेत. तुमच्यामुळे ‘बिग बॉस’देखील थांबलेत असं घरातील इतर सदस्य वर्षाताईंना म्हणत आहेत. आता वर्षाताई लिव्हिंग एरियामध्ये आल्यावर ‘बिग बॉस’ काय आदेश देणार हे जाणून घेण्यास ‘बिग बॉस’प्रेमी उत्सुक आहेत.

‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर.

हा कार्यक्रम बघणे म्हणजे स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालवणे