Homeकल्चर +शनिवारी आनंद घ्या...

शनिवारी आनंद घ्या ‘युवा महोत्सवा’चा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे प्रीती ठाकोरभाई देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्राच्या सभागारात शनिवार, दिनांक १० जून रोजी सायंकाळी पाच वाजता ‘युवा महोत्सव’ आयोजित केला आहे. यात क्षितिजा सहस्त्रबुद्धे यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आणि एस. आकाश यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहवे, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

क्षितिजा सहस्रबुद्धे या आग्रा, ग्वाल्हेर, जयपूर घराण्याच्या विदुषी शुभदा पराडकर यांच्या शिष्या आहेत. त्यांनी संगीत या विषयात एम. ए. केले असून संगीत अलंकार ही पदवीही प्राप्त केली आहे. काही संगीत संमेलनांमध्ये त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी आणि अमेय बिचु संवादिनीची साथ करतील. एस. आकाश यांनी वयाच्या चौथ्या वर्षी बासरीवादनाच्या शिक्षणाचा प्रारंभ केला आणि सातव्या वर्षी त्यांना उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कर्नाटकच्या राज्यपालांकडून पुरस्कार मिळाला होता. इतरही अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. त्यांना तबल्याची साथ इशान घोष करतील.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content