Homeकल्चर +यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट...

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २१ मार्चपासून मुंबईत!

मुंबईतले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत १२वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात हा महोत्सव होणार आहे.

यंदाचा महोत्सव दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन २१ मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित राहतील. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल तसेच प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले हेही यावेळी उपस्थित राहतील.

या महोत्सवात जागतिक पातळीवरील ३०, भारतीय ५ आणि मराठी ५ असे एकूण ४० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना भारतीय तसेच फ्रांस, इंडोनेशिया, जर्मनी, इस्त्राइल, रशिया, हंगेरी, सौदी अरेबिया, इटली, ब्रिटन, रोमानिया, ब्राझिल, स्पेन आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

कोरोनाच्या कालखंडानंतर मुंबईत होणारा हा एकमेव यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content