Homeकल्चर +मराठी ताऱ्यांसोबतचा आनंद देणारा...

मराठी ताऱ्यांसोबतचा आनंद देणारा खास ‘फिल्मी कट्टा’!

मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “अल्ट्रा झकास” मराठी ओटीटी, आता सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांसोबत चित्रपटाच्या कल्पनेपासून ते निर्मितीपर्यंतच्या सर्जनशील प्रक्रियावर दिलखुलास गप्पांचा आकर्षक टॉक शो “फिल्मी कट्टा” रसिकांसाठी सादर करत आहे.

“फिल्मी कट्टा”, या शोद्वारे प्रेक्षकांना चित्रपटाच्या पडद्यांमागच्या गमतीदार गोष्टींचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. या शोमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित दिग्दर्शक, निर्माते, लेखक येऊन त्यांचे वैयक्तिक अनुभव, आव्हाने आणि चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील यशाची गुपितं उघड करणार आहेत. चर्चांमध्ये कथाकथन तंत्र, पटकथालेखन, दिग्दर्शन, छायांकन, अभिनय आणि चित्रपट निर्मितीच्या एकूण प्रक्रियेसह विविध विषयांचा समावेश आहे. शोचा उद्देश केवळ मनोरंजनच नाही तर इच्छुक चित्रपट निर्मात्यांच्या सर्जनशील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी अनमोल ज्ञान आणि प्रेरणा देणे हा आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल याबद्दल म्हणाले की, अल्ट्रा समुहाद्वारे आम्ही नेहमीच मराठी सिनेमा आणि त्याच्या प्रतिभावान निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर असतो. ‘फिल्मी कट्टा’ हा सर्व रसिक प्रेक्षकांच्या आवडीस उतरेल यात शंका नाही. सिनेसृष्टीत येऊ पाहणाऱ्या नव्या आणि होतकरू तरुणांना ज्येष्ठ अनुभवी दिग्गजांचा प्रेरणारूपी अनुभव मार्गदर्शक ठरेल, याची खात्री आहे.

“फिल्मी कट्टा” प्रेक्षकांना www.ultrajhakaas.com वेबसाइटद्वारे किंवा Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर अधिकृत ULTRA JHAKAAS मराठी ओटीटी अॅप डाउनलोड करून पाहायला मिळेल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content