Homeकल्चर +ओटीटीच्या माध्यमातून आनंद...

ओटीटीच्या माध्यमातून आनंद लुटा ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’चा!

गूढ, गुपितं, रहस्य आणि या अशा थराराने तुडूंब भरलेल्या कथा आणि त्यांचा होत जाणारा उलगडा नेहमीच आपल्याला रोमांचकारक अनुभव देत असतो आणि आपण त्यांची अनुभूतीही घेत असतो. अशाच रहस्यांनी भरलेले ‘सिमर’ आणि ‘लिपस्टिक मर्डर’ हे दोन मराठी डब चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत.

इन्स्पेक्टर राज एका सिरीयल किलरच्या केसचा तपास करत आहे. तो अधिक तपास करत असताना, एका मुलीच्या प्रेमात पडतो पण ज्या केसचा तो तपास करत आहे, त्या केसचा मुख्य आरोपी ती मुलगीच निघाली तर? ‘लिपस्टिक मर्डर’ची कथा या प्रश्नात पाडते तर   हॉटेलमधल्या एका तरुण आचाऱ्याला त्याच्या कुटुंबासाठी मोठ्या रकमेची गरज असते. तेव्हा त्याचा मालक त्याला मोठी रक्कम मिळवण्याची एक संधी देतो. हॉटेलचे काम झाल्यानंतर एक विशिष्ट पेटी रोज एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवणे.. परंतु त्यात एक अट आहे की, ती पेटी चुकूनही उघडायची नाही. पेटी आणि पेटीमधील अदृश्य गुपिताभोवती ‘सिमर’ची कथा फिरते.

चित्रपट, वेब सिरीज आणि अन्य कार्यक्रमांतून ‘अल्ट्रा झकास’ हा महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सातत्य ठेवत असून रसिक प्रेक्षकांचा आवडता ओटीटी बनला आहे. आजवरच्या दर्जेदार चित्रपटांबरोबरच सप्टेंबर महिन्यात ‘लिपस्टिक मर्डर’ आणि ‘सिमर’ या दोन दर्जेदार रहस्यमय मराठी डब चित्रपटांचा समावेश करून आम्ही प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालत आहोत. आशा आहे की या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद आणि प्रेम मिळेल, अशी भावना अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात व्यक्त केली.

अदृश्य रहस्याची उकल करण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या एचडी कन्टेंटचा.

App link:

https://ultrajhakaas.app.link

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content