Homeकल्चर +श्रृती सडोलीकर यांची...

श्रृती सडोलीकर यांची १९ जूनला ध्वनिमुद्रित मैफिल

मुंबईच्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने ‘स्वरसंचित’ या शीर्षकाअंतर्गत दर महिन्याला एका विख्यात गायक कलाकाराची ध्वनिमुद्रित मैफील प्रसारित करण्यात येते. त्याअंतर्गत  रविवार, १९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता विदुषी श्रुती सडोलीकर यांची ध्वनिमुद्रित मैफिल प्रसारित होणार आहे.

सडोलीकर जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचे संगीताचं शिक्षण प्रथम त्यांचे वडील प्रसिद्ध गायक वामनराव सडोलीकर यांच्याकडे झाले. त्यानंतर त्यांनी गुल्लूभाई जसदनवाला यांच्याकडे पुढील तालीम घेतली. त्या शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, टप्पा, ठुमरी, नाट्यसंगीत सादर करतात. त्या लखनौ येथील भातखंडे संगीत विद्यालयाच्या उप कुलपती म्हणून २००९ ते २०२० या काळात कार्यरत होत्या. त्यांना संगीत नाटक ॲकॅडमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

ही मैफील केंद्राच्या युट्यूब प्रणालीवर  कायमस्वरूपी ठेवण्यात येईल. आपण त्याचा तेथेही आनंद घेऊ शकता.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content