Homeकल्चर +रविवारी आनंद घ्या...

रविवारी आनंद घ्या डॉ. पौर्णिमा धुमाळे यांच्या शास्त्रीय संगीताचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवारी, १० सप्टेंबर २०२३ या दिवशी सायंकाळी पाच वाजता डॉ. पौर्णिमा धुमाळे यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी आणि संवादिनीची साथ सिद्धेश बिचोलकर करतील. हा कार्यक्रम कै. नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी प्रायोजित केला आहे.

डॉ. पौर्णिमा धुमाळे या आग्रा घराण्याच्या प्रतिभावंत गायिका असून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या आई किराणा घराण्याच्या गायिका डॉ. सुलभाताई ठकार यांच्याकडे घेतलं. त्यानंतर त्यांनी १५ वर्षे आग्रा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. बबनराव हळदणकर यांच्याकडे सखोल तालीम घेतली.  त्या सध्याच्या काळातील आग्रा घराण्याच्या आघाडीच्या अष्टपैलु गायिका कलाकार आहेत. त्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या ‘ए’ ग्रेड कलाकार असून शास्त्रीय संगीताबरोबर उपशास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम करत असतात. सध्या त्या एसएनडीटी विद्यापीठ पुणे, येथे संगीत विभागच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content