Homeएनसर्कलतीन दिवसांत साडेतीन...

तीन दिवसांत साडेतीन कोटींची वीजचोरी उघड! 

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेत राज्यातली अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये 24 ते 26 एप्रिलदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एकूण 383 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. या तीन दिवसांमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक 121, कोकण परिक्षेत्रात 117, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात 92 तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत 53 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. या वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या वीजचोरीप्रकरणी अंदाजे 3 कोटी 50 लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला असून पुढील कार्यवाही चालू आहे.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) सुमित कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याने ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content