Homeटॉप स्टोरीदुबई, बँकॉकसह सिंगापूर...

दुबई, बँकॉकसह सिंगापूर प्रवासाला भारतीयांची पसंती! मार्च फायदेशीर!!

रंगीबेरंगी बाजारपेठा, समुद्रकिनारे आणि उत्तम खरेदी या गोष्टी भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असून ३१ ऑक्टोबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत प्रवासासाठी शोधण्यात आलेल्या रिटर्न इकॉनॉमी इंटरनॅशनल ठिकाणांमध्ये दुबई, बँकॉकसह सिंगापूर प्रवासाला भारतीयांनी पसंती दर्शवली आहे,  तर देशांतर्गत प्रवासाकरिता गोव्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यापाठोपाठ अंदमान आणि निकोबार बेटांना स्थान दिले गेले आहे.

कायक (KAYAK) या जगातील आघाडीच्या सर्च इंजिनने भारतीय पर्यटकांच्या आवडत्या पर्यटनस्थळांचा आढावा घेतला आहे. दरम्यान कायकने स्वस्तातल्या फ्लाइट्ससाठी सर्वोत्तम प्रवास आणि बुकिंगच्या वेळादेखील जाहीर केल्या आहेत. ज्यांनी अजून आपली ट्रिप बुक केलेली नाही आणि बँकॉकसाठी ट्रिप बुक करायची आहे ते लोक मार्चच्या मध्यावर प्रवासाचा विचार करू शकतात (१३-१९ मार्च २०२३). कारण, त्यांना नवीन वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत ३३ टक्के बचत करता येईल. कायक सर्चच्या माहितीनुसार प्रवासाच्या कालावधीत कोणत्याही बुधवारी प्रवास सुरू करणे परवडणारे ठरेल.

मालदीवचे अत्यंत सुंदर स्थान रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वाधिक शोधले गेलेले स्थान असून ते मार्च २०२३च्या मध्यावर प्रवासासाठी उत्तम ठरेल. त्यामुळे एप्रिलच्या शेवटी सर्वाधिक महागड्या कालावधीच्या तुलनेत प्रवाशांना ४९% बचत करून देईल.

टोरंटो हे कॅनडातील शहर पहिल्या १०पैकी असून ते १०व्या क्रमांकावरच आहे. पुढील सहा महिन्यांत भारत आणि टोरंटो यादरम्यान सरासरी रिटर्न इकॉनॉमी फ्लाइट सुमारे ११५,३२३ रूपये असून तुमचा प्रवास सुरू करण्याची सर्वोत्तम वेळ बुधवार आहे.

कायकचे भारताचे राष्ट्रीय व्यवस्थापक तरूण ताहिलियानी यांनी सांगितले की, “कायकच्या सर्च डेटामधून हे दिसून येते की, भारतीय पर्यटक पुढील ६ महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्थानांना भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. दुबई, बँकॉक आणि सिंगापूर ही लोकप्रिय ठिकाणे आहेत. परदेशी प्रवासाच्या सर्व आनंदासह तुलनेने कमी प्रवासाच्या आणि वेगवान फ्लाइट्स उपलब्ध आहेत.

कायकच्या माहितीतून असे दिसून येते की, मार्चच्या सुरूवातीला प्रवास केल्यास आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर उत्तम डील्स मिळू शकतात. साधारण नववर्षाच्या आसपासच्या गर्दीच्या प्रवासाच्या तारखा टाळल्याने भारतीय प्रवाशांना सर्वोत्तम शक्य दर मिळू शकतात आणि आम्ही तुमच्या सुट्टीसाठी एका उत्तम किंमतीत तुम्ही ठरवलेल्या ठिकाणी प्राइज एलर्ट सुरू करण्याची शिफारस करतो.

भारतीय प्रवाशांसाठी रिटर्न इकॉनॉमी फ्लाइट्सच्या सर्वोच्च १० स्थानांचा कायक सर्च इनसाइट, ३१ ऑक्टोबर २०२२ आणि ३० एप्रिल २०२३* या कालावधीत प्रवास आणि बुकिंग करण्यासाठीचा सर्वोत्तम कालावधी:

सर्च रँकप्रवासाचे गंतव्यप्रवासाच्या कालावधीत इकॉनॉमी क्लाससाठी रिटर्न फ्लाइटची सरासरी किंमत (रूपयांमध्ये)प्रवासाच्या कालावधीत इकॉनॉमी क्लाससाठी रिटर्न फ्लाइटची सरासरी किंमत (रूपयांमध्ये)  / २०२२ मधला सर्वोत्तम मूल्याचा पर्यटन आठवडाप्रवासाच्या कालावधीत इकॉनॉमी क्लाससाठी राऊंड ट्रिपची सरासरी किंमत (रूपयांमध्ये)  / २०२२ मधला सर्वोत्तम मूल्याचा पर्यटन आठवडाप्रवास कालावधीत पर्यटन सुरू करण्यासाठी सर्वाधिक परवडणारा दिवस
१दुबई,  संयुक्त अरब अमिराती ₹२७,५८७२५,०२२-४५ वा आठवडा₹२१,१५५- १० वा आठवडारविवार
२गोवा, भारत१२,४५३ रू.११,७६९ रू. –४८ वा आठवडा९,३४६ रूपये- १७ वा आठवडासोमवार
३बँकॉक, थायलंड२३,७६१ रू.२१,८३९- ४७ वा आठवडा२०,२६० रूपये- ११ वा आठवडाबुधवार
४सिंगापूर, सिंगापूर२५,३७० रूपये.२४,१३५ रू.- ४५ वा आठवडा१८,६६० रूपये- ८ वा आठवडाबुधवार
५बाली, इंडोनेशिया३७,९०२ रूपये३५,५४७ रूपये- ४५ वा आठवडा३०,९३६ रूपये- १० वा आठवडारविवार
६माले, मालदीव२६,४१६ रू.२३,१५१ रू- ४५ वा आठवडा२२,४७४ रूपये- १० वा आठवडासोमवार
७लंडन, युनायटेड किंग्डम६६,०११ रूपये६२,५२९ रूपये- ४७ वा आठवडा५३,२५६ रूपये- १० वा आठवडामंगळवार
८नवी दिल्ली१०,८०६ रूपये१०,११८ रूपये- ४५ वा आठवडा८,१०६ रूपये- चौथा आठवडाबुधवार
९अंदमान आणि निकोबार बेटे, भारत२३,५१८ रूपये२२,६५७ रूपये- ४७ वा आठवडा१४,१८५ रूपये- १५ वा आठवडाशुक्रवार
१०टोरंटो, कॅनडा१,१५,३२३ रूपये१,०६,९५९ रूपये- ४५ वा आठवडा९७,५२७ रूपये- १० वा आठवडाबुधवार

Continue reading

लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ३० नोव्हेंबरला?

महिला आरक्षणाला जोडून देशातल्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आणि ही प्रक्रिया २०२९च्या लोकसभा निवडणुकीआधी पूर्ण करण्यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपासून संसदेचे चार दिवसांचे अधिवेशन होणार असल्याचे समजते. येत्या ३० नोव्हेंबरला लोकसभेचे एक दिवसाचे अधिवेशन होईल तर दोन डिसेंबरला राज्यसभेत एका...

‘मालवणी रोंबाट’चे प्रकाशन

कवी अरविंद परुळेकर लिखित 'मालवणी रोंबाट', या अनोख्या साहित्यकृतीचा भव्य प्रकाशन सोहळा काल रविवारी, मुंबईतल्या गोरेगाव येथील प्रज्ञाबोधिनी हायस्कूल हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास एखाद्या कौटुंबिक मेळाव्याचे स्वरूप आले होते. कवि अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी, शशिकांत तिरोडकर, प्रख्यात...

समकालीन भान आणि साहित्यिक मूल्य जपणारा ‘हेमांगी’!

महाराष्ट्रातील दर्जेदार दिवाळी अंकाच्या परंपरेतील महत्त्वाचे नाव म्हणजे ‘हेमांगी’. यंदा ‘हेमांगी’चा ५१वा दिवाळी अंक प्रकाशित झाला. यंदाच्या काही मोजक्या सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांमध्ये या अंकाचा समावेश करावा लागेल. या अंकात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी अमेरिका-इराण युद्धाची नेमकी कारणे कोणती,...
Skip to content