Homeब्लॅक अँड व्हाईटछ. संभाजीनगरमध्ये 250...

छ. संभाजीनगरमध्ये 250 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त!

पैठण एमआयडीसीच्या औद्योगिक परिसरात महालक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाचा मेफेड्रोन आणि केटामाइनचे उत्पादन करणारा कारखाना आढळून आला. या ठिकाणाहून एकूण 4.5 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाइन आणि सुमारे 9.3 किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त करण्यात आले. या अंमली आणि मनोविकृतीकारक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किमत 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची नोंद केली गेली आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही कारवाई केली आहे.

अंमली

अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी कायदा 1985 (NDPS 1985) च्या संबंधित तरतुदींनुसार हे सर्व पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यातील एका आरोपीच्या निवासी परिसराची झडती घेतल्यावर सुमारे 23 किलो कोकेन, सुमारे 2.9 किलो मेफेड्रोन आणि 30 लाख रुपये मूल्याच्या भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार मुख्य सूत्रधारासह दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

महसूल गुप्तचर संचालनालयाचा अहमदाबाद विभाग आणि गुजरात पोलीसांची अहमदाबाद गुन्हे शाखा यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे  महसूल गुप्तचर संचालनालयाने शुक्रवार, 20.10.2023 रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ संबंधी कायदा 1985 अंतर्गत शोधमोहीम राबवली. नंतर औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही या कारवाईत सहकार्य केले.

सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिककारखान्यांचा गैरवापर ही गोष्ट महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) या कारवाईमुळे उघडकीस आली आहे. त्याचबरोबर देशात अंमली पदार्थांच्या धोक्याचा सामना करण्यासाठी आंतर-एजन्सी सहकार्याचे महत्त्व देखील या कारवाईने अधोरेखित झाले आहे.

Continue reading

डोनाल्ड ट्रम्पच्या मनमानीला लागणार लगाम?

मनात आले, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना उचलून आणलं, इराणवर हल्ला केला, भारताच्या रशियाकडून होणाऱ्या तेलखरेदीवर निर्बंध लादले, आयातकर (टॅरिफ) दुप्पट-तिप्पट केला, अमेरिकेतल्या भारतीयांच्या व्हिसावर निर्बंध लादले, अशी मनमानी करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना लगाम लागणार की, हे अधिकार अधिक...

पंतप्रधान मोदी करणार आज पुण्याच्या ‘पिंक लाईन’ मेट्रोचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी तसेच ‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3चे उद्घाटन करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात...

बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेपाठोपाठ मुंबईकराच्या दैनंदिन जीवनातल्या लाईफलाईनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनाही यंदा ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांची संघटना श्रमिक उत्कर्ष सभेचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री...
Skip to content