Homeपब्लिक फिगरमराठी पाट्यांचे श्रेय...

मराठी पाट्यांचे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नका!

महाराष्ट्रातल्या दुकानांच्या पाट्या मराठीतच ठेवण्याच्या आदेशाचे श्रेय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच आहे. इतर कुणी त्याचे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये, अशा शब्दांत आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला खडसावले.

कालच राज्य सरकारने सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतही तितक्याच ठळकपणे ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावर एका पत्राद्वारे राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केले.

आपल्या पत्रात ठाकरे म्हणतात की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरेतर आंदोलन करावे लागूच नये. परंतु, २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलने केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. काल राज्य मंत्रिमंडळाने दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. बाकी कुणी हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकांचाच. सरकारने आता कच खाऊ नये आणि याची नीट अंमलबजावणी करावी.

यात आणखी एक भानगड सरकारने करून ठेवली आहे. मराठी भाषेशिवाय इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतली मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका, असेही राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे बजावले आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content