Homeकल्चर +मुंबईत दिव्य कला...

मुंबईत दिव्य कला मेळ्याची दिमाखदार सुरुवात

केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी काल मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या एमएमआरडीए मैदान क्रमांक-1 इथे आयोजित दिव्य कला मेळा 2023चे उद्घाटन केले. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि लोकसभेचे खासदार गोपाळ शेट्टी यावेळी उपस्थित होते.

या प्रदर्शनात जवळजवळ 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 200 दिव्यांगजन  कारागीर, कलाकार आणि उद्योजक त्यांची उत्पादने आणि कौशल्ये प्रदर्शित करत आहेत. घराची सजावट आणि जीवनशैली उत्पादने, कपडे, स्टेशनरी आणि पर्यावरणपूरक उत्पादने, खाद्यपदार्थ आणि सेंद्रिय उत्पादने, खेळणी आणि भेटवस्तू, दागिने यासारख्या वैयक्तिक वापराच्या वस्तू, या प्रदर्शनाचे  प्रमुख आकर्षण आहे.  दिव्य कला मेळा 2023मध्ये, जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या विविध भागांमधील हस्तकला, हातमाग, भरतकाम आणि खाद्यपदार्थांसह विविध उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत.

दिव्य कला मेळा 25 फेब्रुवारी 2023पर्यंत मुंबईत बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आला आहे आणि सर्व दहा दिवस सकाळी 11.00 ते रात्री 9.00 या वेळेत तो नागरिकांसाठी खुला राहील. या मेळ्यात विविध दिव्यांगजन कलाकार आणि नामवंत व्यावसायिक कलाकारांच्या सादरीकरणासह सांस्कृतिक उपक्रमांची मालिका असेल. या मेळ्याला भेट देणाऱ्यांना देशाच्या विविध प्रांतामधील त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचा, दिव्यांगजन (अपंग व्यक्ती) सक्षमीकरण विभाग, देशातील दिव्यांगजन व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवितो. दिव्यांगजनांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एनएचएफडीसी कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य पुरवते.  दिव्यांगांना बाजारपेठेचे सहाय्य मिळवून देण्याच्या हेतूने त्यांना देशभरात भरणाऱ्या मेळावे आणि प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी विनामूल्य जागा म्हणजे स्टॉल्स दिले जातात.

दिव्यांगजनांची उत्पादने, उत्पादनांचे ब्रॅण्डिंग व विकास आणि बाजारपेठेचे इतर फायदे मिळवून देण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे मेळावे महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा प्रसिद्ध मेळाव्यांना लोक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे दिव्यांगाकडील कौशल्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यास  मदत होते.  गेल्या काही वर्षांपासून दिव्यांगजन  सक्षमीकरण विभाग  NHFDCच्या सहाय्याने फक्त दिव्यांग जनासाठी असलेले मेळावे आयोजित करत आहे. दिव्य कला मेळा असे या मेळाव्यांचे नामकरण केले आहे.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाने  डिसेंबर 2022मध्ये नवी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्य पथावर दिव्य कला मेला आयोजित केला होता. त्याला भेट देणाऱ्या लाखो लोकांनी दिव्यांगांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू तसेच उत्पादने यांची प्रशंसा केली होती. अशा प्रकारचे मेळावे दिव्यांग बंधू भगिनींसाठी दरवर्षी आयोजित करून ते फक्त दिल्ली मुंबईसारख्या मोठ्या शहरांपुरते मर्यादित न  ठेवता भविष्यात सर्व देशभरात घेण्याचे विभागाचे नियोजन आहे. मुंबईनंतर भोपाळ येथे  मार्च 2023 मध्ये दिव्य कला मेळा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा देशभरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content