Homeमाय व्हॉईस'व्यत्यय' आणि 'गदारोळ'...

‘व्यत्यय’ आणि ‘गदारोळ’ लोकशाहीसाठी मारक!

लोकशाहीत संवाद, चर्चा, विचारविनिमय आणि वादविवाद या मुद्द्यांना स्थान असते मात्र व्यत्यय आणि गदारोळ हे लोकशाही मूल्यांच्या विरोधी आहे असे मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केले.लोकशाहीच्या मंदिरात गदारोळाला शस्त्र म्हणून उपयोगात आणले जात असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी खंत आणि चिंता व्यक्त केली, जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता इथे अखंड कामकाज झाले पाहिजे असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, जेव्हा एखाद्या दिवशी संसदेच्या कामकाजात व्यत्यय येतो, तेव्हा प्रश्नोत्तराचा तास होऊ शकत नाही. प्रश्नोत्तराचा तास ही प्रशासनात जबाबदारी आणि पारदर्शकता निर्माण करणारी यंत्रणा आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास सरकार बांधील आहे. याचा मोठा फायदा सरकारलाही होतो. लोकशाही मूल्ये आणि सुशासनाचा विचार करता प्रश्नोत्तराचा तास नसणे हे कधीही तर्कसंगत असू शकत नाही.

आज विज्ञान भवनात जामिया मिलिया इस्लामियाच्या शताब्दी वर्षाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना, उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले की असहमती आणि मतभेद असणे हा लोकशाही प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे, परंतु असहमतीचे शत्रुत्वात रूपांतर होणे हे लोकशाहीसाठी एखाद्या शापापेक्षा कमी नाही. संवाद आणि चर्चा हाच यातून पुढे जाण्याचा मार्ग असल्याचे ते म्हणाले.

पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावर सध्याच्या सरकारचे प्रामुख्याने लक्ष केंद्रित असल्याचे सांगून धनखड म्हणाले की, भ्रष्टाचारी, मध्यस्थ आणि सत्तेचे दलाल यांना आज स्थान नाही.

शैक्षणिक कामगिरीचे महत्व अधोरेखित करत ज्ञानाचा खरा उद्देश साध्य करण्यासाठी शिक्षणाला मोठ्या सामाजिक विकासाशी जोडणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण पद्धतीमध्ये अधिक लवचिकता प्रदान करणाऱ्या आणि शिकण्याचा आनंद मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP-2020) ची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली आणि विश्वास व्यक्त केला की हे दूरदर्शी धोरण मोठ्या बदलाला प्रेरक ठरेल.

प्रत्येक नागरिकाला देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे विश्वस्त असल्याचे सांगून उपराष्ट्रपतींनी या संसाधनांचे न्याय्य वितरण करण्याचे आवाहन केले. केंद्रीय शिक्षण,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Continue reading

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. व्यंकट गिते

नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. वेंकट गिते यांची नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती ज‍िष्णु देव वर्मा यांनी आज, बुधवारी डॉ. गिते यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. त्यांची नियुक्ती पाच...

E20मुळे गाड्या खराब होतात हा हेतूपुरस्सर चाललेला अपप्रचार!

अब्जावधी रुपयांचे परकीय चलन खर्चून आयात होणारे जीवाश्म इंधन आणि देशातच शेतकऱ्यांच्या घामातून तयार होणारे जैविक इंधन, या दोहोंमधील संघर्षात शेतकरी हिताचे मारेकरी नेमके कोण, असा थेट सवाल महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास...

ॲड. मितांशु पुरंदरे मुंबई भाजपच्या लीगल सेलचे सरचिटणीस

मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲड. मितांशु पुरंदरे यांची मुंबई भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लीगल सेलचे सरचिटणीस म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका शानदार कार्यक्रमात ॲड. मितांशु पुरंदरे यांना याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदान केले. ॲड. अमितकुमार...
Skip to content