Homeचिट चॅटश्री गणेश आखाड्यात...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यावेळी गौरवण्यात आले. महापौर डिंपल मेहता यांचा सत्कार सुनंदा माने आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांचा सत्कार मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष, मिलिंद लिमये यांनी केला. नगरसेवक भगवती शर्मा, सुरेश खंडेलवाल, सचिन डोंगरे, दीपक सावंत, नगरसेविका आकांक्षा वीरकर, किमया रकवी, आभा पाटील यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.

यावेळी आखाड्याचे विविध‌ स्पर्धांत चमकलेले कुस्तीपटू विशाल जाधव, कोमल पटेल, मनीषा शेलार, गणेश शिंदे, सूरज माने, प्रवेश यादव, अनिकेत यादव, डॉली गुप्ता, आदर्श शिंदे, ओम जाधव, समीर बोबडे, स्नेहा मल्ला, देवेंद्र या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिमये यांनी केले. महापौर डिंपल मेहता व उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी आपल्या मनोगतात आखाड्याच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत कुस्तीगिरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या समारंभाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भाग घ्या हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेत

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 'डिस्कवर, परफॉर्म, राइज इन खयाल', या थीमखाली हिंदुस्तानी खयाल गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १६ ते ३० वर्षे वयोगटातील कलाकारांसाठी असून, येत्या २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृह,...

राजकारणच नाही तर आयुष्यातून उठवण्याचे दमानियांचे षडयंत्र!

कृषी साहित्यखरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषीखरेदीबाबत सुरुवातीला उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांनी खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला. त्यांनी...

आखाती संघर्षातून अमेरिकेकडून पॅकअपच्या हालचाली?

आखातात इराणने अमेरिका तसेच इस्त्रायला पूर्णपणे जेरीस आणल्यामुळे हताश झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता युद्धातून पॅकअप करण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र दिसत आहे. आम्ही आमच्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचलो आहोत. इराणची अण्वस्त्रनिर्मिती ठिकाणे आम्ही उद्ध्वस्त केली आहेत. इराणचे नोदल,...
Skip to content