Homeब्लॅक अँड व्हाईटआणखी 6 विमानतळांवर...

आणखी 6 विमानतळांवर होणार डिजी यात्राची सुविधा!

या महिन्यात ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई, अहमदाबाद, कोची, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी या आणखी 6 विमानतळांवर डिजी यात्रा सुविधा सुरू केली जाणार आहे. या विमानतळांवर डिजी यात्रा पायाभूत सुविधांची अंमलबजावणी आणि स्थापना टप्प्याटप्प्याने केली जाईल.

नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य यांच्या हस्ते 1 डिसेंबर 2022 रोजी, नवी दिल्ली, वाराणसी आणि बेंगळुरू या तीन विमानतळांवर, डिजी यात्रा सुविधेचा प्रारंभ झाला. त्यानंतर आणखी चार विमानतळांवर, विजयवाडा, पुणे, हैदराबाद आणि कोलकाता येथे ही सुविधा लागू करण्यात आली. त्यामुळे डिजी यात्रा विमानतळांची संख्या सात झाली होती. आता नव्याने उपरोक्त सहा विमानतळांच्या समावेशासह, डिजी यात्रा-सक्षम विमानतळांची एकूण संख्या तेरा होणार आहे.

डिजी यात्रा सुविधा ही एफआरटी म्हणजेच ‘फेशियल रिकग्निशन टेक्नॉलॉजी’वर आधारित सुविधा आहे. विमानतळांवर प्रवाशांबरोबर संपर्करहित, निर्बाध प्रक्रिया साध्य करण्यासाठी संकल्पित मोबाईल ऍप्लिकेशन-आधारित सुविधा आहे. याद्वारे प्रवाशांना त्यांची ओळख आणि प्रवास तपशील सत्यापित करण्यासाठी त्या व्यक्तीच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचा वापर करून कागदविरहीत आणि कोणत्याही प्रकारे संपर्करहीत प्रक्रियेद्वारे विमानतळावरील विविध तपास स्थानांमधून जाण्यास मदत होते.

डिजी यात्रा प्रक्रियेत, प्रवाशांच्या वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती (पीआयआय) डेटाचे कोणत्याही प्रकारे केंद्रीय संचयन केले जात नाही. प्रवाशांचा सर्व डेटा त्यांच्या स्मार्टफोनच्या वॉलेटमध्ये एनक्रिप्टेड आणि संग्रहित केला जातो.

तसेच माहिती फक्त प्रवासी आणि ती व्यक्ती प्रवास करीत असलेल्या मूळ विमानतळावर त्यासंबंधित स्थान यांच्यामध्येच सामायिक केली जाते. यासाठी प्रवाशाला डिजी यात्रा आयडी प्रमाणित करणे आवश्यक आहे. उड्डाणानंतर 24 तासांच्या आत विमानतळाच्या सिस्टममधून डेटा काढून टाकला जातो. प्रवासी जेव्हा प्रवास करतात तेव्हाच आणि केवळ मूळ विमानतळावर डेटा थेट सामायिक केला जातो. डिजी यात्रा सुविधेचा 10 ऑगस्ट 2023 पर्यंत, 34,60,454 हवाई प्रवाशांनी वापर केला आहे. त्याच तारखेपर्यंत, डिजी यात्रा मोबाईल ऍप्लिकेशन वापरकर्त्यांची संख्या 1.29 दशलक्ष होती.

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content