Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाविकास...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाविकास आघाडीत बिघाडी!

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून महाविकास आघाडीमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे मंगळवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत स्पष्ट झाले. एकीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केलेली असतानाच अशी मागणी कालबाह्य झालेली असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वी क्लोज केला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले.

सीमा

सीमाप्रश्नी मराठी भाषकांची गळचेपी होऊ नये, यासाठी सीमाभाग केंद्रशासित करावा, ही मागणी आता कालबाह्य झालेली आहे, असे स्पष्ट करून काही वर्षांपूर्वी ही मागणी योग्य होती. पण आता सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण खूप पुढे गेलेले आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना व्यक्त केले.

सीमा

सीमाभागातील मराठी भाषकांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ आणि सर्व जनता खंबीरपणे असून हा सर्व भाग म्हणजे बेळगाव, कारवार, बिदर, निपाणी, भालकीसह ८६५ गावे महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाली पाहिजेत, अशा आशयाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हा भाग केंद्रशासित करण्याची ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी केलेली  मागणी सभागृहात फेटाळण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील खटल्यासाठी हरीश साळवे यांना महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती करण्यात आली असून ती त्यांनी मान्य केली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी यासंदर्भात मांडलेल्या ठरावात दिली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content