Homeन्यूज अँड व्ह्यूजश्री महालक्ष्मी देवीच्या...

श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची जबाबदारी निश्चित करा!

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर अनेकदा रासायिक संवर्धन करण्यात आले आहे. या सर्व संवर्धनामुळे मूर्तीची स्थिती गंभीर होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. असे असताना आता पुन्हा एकदा १४ आणि १५ एप्रिलला भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. तेव्हा सर्प्रवथम या रासायनिक संवर्धनामुळे पुन्हा श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची हानी झाली अथवा काही गडबड झाली, तर त्याची पूर्ण जबाबदारी निश्‍चित करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांना देण्यात आले. याप्रसंगी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती संतोष गोसावी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, अंबाबाई भक्त समितीचे प्रमोद सावंत, हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे आणि शिवानंद स्वामी हे उपस्थित होते.

यापूर्वी २०१५पासून अनेकदा करण्यात आलेल्या संवर्धनातून काहीही साध्य होत नसताना आता पुन्हा मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. २०१५मध्ये झालेल्या संवर्धनामुळे मूर्तीवर गंभीर परिणाम झाले आहेत, असा स्पष्ट अहवाल आहे. त्यामुळे आता जे संवर्धन होणार आहे त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याची नेमकी जबाबदारी निश्‍चित करणे आवश्यक आहे. ही जबाबदारी निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी. याअगोदर ज्यांच्यामुळे मूर्तीची हानी झाली त्या सर्व संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत तसेच मूर्तीचा मुद्दा धार्मिक असल्याने त्यासंदर्भात संत, धर्माचार्य, शंकराचार्यांचे विविध पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे, असे या पत्रात म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतरही २०१५मध्ये श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे रासायिक संवर्धन करण्यात आले. पुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा २०१७मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले. त्यावेळीही परत एकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. नुकतेच पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी मूर्तीच्या संदर्भात न्यायालयात सादर केलेल्या अहवालात श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज २०१५मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे, असे नमूद केले आहे. २०१५मध्ये जेव्हा रासायनिक संवर्धन करण्यात आले तेव्हा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीच्या स्थितीस प्रक्रिया करणारे पुरातत्त्व खाते सर्वस्वी जबाबदार असेल, असे जिल्हाधिकार्‍यांनी त्यावेळी सांगितले. असे असताना ९ वर्षानंतरही मूर्तीच्या स्थितीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही मंदिर महासंघाने या पत्रात केला आहे.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content