Homeबॅक पेजयंदाचा संरक्षण वार्ताहर...

यंदाचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम विशाखापट्टणमला सुरू

संरक्षण मंत्रालयाद्वारे, राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यम संस्थांमधील निवडक पत्रकारांसाठी आयोजित, तीन आठवड्यांचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम  (DCC) 2023, नुकताच पूर्व नौदल कमांड (ईएनसी), विशाखापट्टणम येथे सुरू झाला.

व्हाइस अॅडमिरल समीर सक्सेना  एवीएसएम, एनएम चीफ ऑफ स्टाफ, ईएनसी  यांनी उद्घाटनपर भाषण केले. संरक्षण मंत्रालयातील प्रवक्ते आणि अपर महासंचालक (माध्यमे आणि संज्ञापन) ए भारतभूषण बाबू यांनी सागरी युद्ध केंद्रातील संरक्षण पत्रकारिता अभ्यासक्रमाची माहिती दिली. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट माध्यमे आणि सैन्य यांना परस्परांच्या अधिक जवळ आणणे आणि सर्व स्तरावर पत्रकारांना सशस्त्र दलांच्या कामगिरीचे अधिक चांगले आकलन व सागरी वृत्तांकनासाठी सक्षम करणे, हे आहे.

एक आठवड्याच्या अभ्यासक्रमादरम्यान, सहभागींना नौदल आणि तटरक्षक दलातील विषयतज्ज्ञ माहिती देतील. ते पत्रकारांना नौदलाच्या नौदल संचालन, नौदल कूटनीती, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाची संघटनात्मक रचना यासह नौदलाच्या विविध पैलूंबाबत अवगत करतील. अभ्यासक्रमांतर्गत सहभागींनी 21 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय नौदल जहाज आणि पाणबुडीला भेट दिली. जहाजावर राहण्याच्या अनुभवाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.

या आठवड्यात विशाखापट्टणम येथे तटरक्षक दलाची जहाजे, नौदल डॉकयार्ड, नौदल हवाई केंद्र येथे सहभागींचा नियोजित दौरा आहे. समुद्रात भारतीय नौदलाच्या अग्रणी युद्धनौकेवरून नौदलाच्या सागरी मोहिमांविषयी जाणून घेणे, हे या टप्प्यातील अभ्यासक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे.

Continue reading

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...

आज व उद्या मुंबईतल्या काही इमारतीत वाजणार सायरन

नवी दिल्लीतल्या नागरी संरक्षण विभागाचे महासंचालकांच्या निर्देशानुसार दूरसंचार विकास केंद्र (सी-डॉट), सी-डॉट परिसर, मेहरौली, नवी दिल्ली येथील पथकाच्यावतीने मुंबईत प्रोटोटाइप सायरन उपकरणाची चाचणी आज आणि उद्या म्हणजेच ८ व ९ ऑक्टोबरला करण्यात येत आहे. बृहन्मुंबई शहरातील जुने सचिवालय, जोड...
Skip to content