Homeएनसर्कल48.67 लाख केंद्रीय...

48.67 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 4%ने वाढला, पेन्शनधारकांनाही फायदा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाईवरील सवलतीचा हप्ता (DR) वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. 01.07.2023 पासून झालेल्या महागाईची भरपाई करण्यासाठी, सध्याच्या मूळ वेतनाच्या/निवृत्तीवेतनातच्या 42 टक्क्यांत आणखी 4% वाढ झाली आहे. ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारीत स्वीकृत सूत्रानुसार केलेली आहे.

महागाई भत्ता आणि महागाई सवलत या दोन्हींमुळे सरकारी तिजोरीवर एकत्रित 12,857 कोटी रुपये प्रतिवर्ष इतका भार वाढेल.याचा लाभ सुमारे 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content