Homeब्लॅक अँड व्हाईटयेत्या 19 मार्चला...

येत्या 19 मार्चला होणार कस्टम्स ब्रोकर परवाना परीक्षा!

कस्टम्स ब्रोकर परवाना परीक्षा 2024, चे आयोजन 19 मार्च 2024 रोजी होणार आहे. कस्टम्स ब्रोकर परवाना परीक्षा 2024च्या ऑनलाईन लेखी परीक्षेबाबत माहिती मिळवण्यासाठी दिनांक 28.08.2023 रोजी राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात बघावी. लेखी आणि तोंडी परीक्षा खालील पद्धतीने घेण्यात येईल.

बहुपर्यायी प्रश्न असलेली संगणकाधारित परीक्षा असे लेखी परीक्षेचे स्वरूप असेल. ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये घेण्यात येईल. उमेदवारांना इंगजी अथवा हिंदी यापैकी एका भाषेत उत्तरे देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

या परीक्षेचे इतर तपशील पुढीलप्रमाणे आहेत:

प्रश्नांची संख्या               :          150

कालावधी                   :   अडीच तास (सकाळी 10.30 ते दुपारी 1.00)

गुणांकन पद्धत              :   प्रत्येक योग्य उत्तरासाठी 3 अधिक गुण

                               प्रत्येक अयोग्य उत्तरासाठी उणे 1 गुण 

कमाल गुण                   :           450

उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण :         270 (60%)

लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कस्टम्स ब्रोकर परवाना नियम, 2018मधील नियम क्र.6मध्ये सुधारणा केल्यानुसार तोंडी परीक्षा द्यावी लागेल. तोंडी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी (www.cbic.gov.in and www.nacin.gov.in) या संकेतस्थळाला भेट द्या अथवा जवळच्या सीमाशुल्क आयुक्तालय किंवा एनएसीआयएन, फरीदाबाद येथे ईमेलद्वारे संपर्क साधा.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content