Homeकल्चर +श्री गणेशमूर्तीचे विसर्जन...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत!

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्रीगणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वाहत्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याच्या कारणाने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. विसर्जनाच्या वेळी जेथे विसर्जन केले, तेथील माती घरी आणून ती सर्वत्र शिंपडण्याची प्रथा आहे.

श्री गणेशमूती विसर्जनाबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून आणलेले देवत्व एक दिवसापेक्षा जास्त दिवस राहूच शकत नाही. याचाच अर्थ गणेशविसर्जन केव्हाही केले, तरी श्री गणेशमूर्तीतील देवत्व दुसऱ्या दिवशी नष्ट झालेले असते; म्हणून कोणत्याही देवाची उत्तरपूजा केल्यावर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन होणे, हे सर्वथैव इष्ट आहे. सोयर वा सूतक असले तरी पुरोहिताकडून गणेशव्रत आचरले जाणे इष्ट आहे. त्याचप्रमाणे घरातील प्रसूतीची वगैरे वाट न पाहता ठरल्याप्रमाणे विसर्जन करणे हे शास्त्राला धरून आहे.

. मूर्तीचे विसर्जन वाहत्या पाण्यात करण्याचे महत्त्व: उत्तरपूजेनंतर मूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. उपासनाविधींमुळे गणपतीच्या तत्त्वाने समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन जलात केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच वाहत्या पाण्याबरोबर ही पवित्रके सर्वदूर पोहोचतात व अनेकांना त्यांचा लाभ मिळतो. या पाण्याचे बाष्पीभवनही होत असल्याने एकंदर वातावरण सात्त्विक होण्यास मदत होते. एखाद्या ठिकाणी वाहते पाणी उपलब्ध नसल्यास मूर्तीचे विसर्जन विहिरीत करावे.

. ‘मूर्तीविसर्जन’ ही समस्या नाही: हल्लीच्या काळी अपुरे जलस्रोत, दूषित जल, दुष्काळ इत्यादींमुळे ‘मूर्तीविसर्जन’ ही समस्या वाटते. पण लक्षात घ्या, ‘मूर्तीविसर्जन’ ही समस्या असली, तरी ती पुढीलप्रमाणे सोडवता येते.

१. सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या हल्ली खूप वाढली आहे. त्यावर उपाय  म्हणून ‘एक गाव – एक गणपति’ व शहरात ‘एक विभाग – एक गणपति’ हे सूत्र पाळून आपण गणेशोत्सव साजरा करू शकतो.

२. प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न वापरता मूर्ती शाडूमातीची व नैसर्गिक रंगांनी रंगवलेलीच वापरू शकतो. प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात सहजरीत्या विरघळत नसल्याने मूर्तीचे नीट विसर्जन होत नाही.

. मूर्तीदान करू नका; मूर्ती विसर्जित करा: जलप्रदूषणाचे कारण पुढे करून काही धर्मद्रोही संघटना मूर्तीविसर्जनाच्या ऐवजी मूर्तीदान करण्याचे आवाहन करतात; परंतु मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय तसेच धर्मद्रोही कृत्य आहे; कारण-

१. गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधी आहे.

२. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही.

३. गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे की, जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसऱ्याला दान म्हणून दिली.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘गणपति’

संपर्क क्रमांक: 9920015949   

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content